घरCORONA UPDATEदेशात कोरोनाचा विळखा घट्ट! लवकरच बाधितांच्या संख्येत भारत ब्राझीलला टाकणार मागे

देशात कोरोनाचा विळखा घट्ट! लवकरच बाधितांच्या संख्येत भारत ब्राझीलला टाकणार मागे

Subscribe

देशात दिवसेंदिवस कोरोनाचा विळखा आणखीन घट्ट होतोना दिसत आहे. दररोज नव्या कोरोनाबाधितांच्या संख्येत मोठी वाढ होत आहे. आज देशातील कोरोना रुग्ण संख्येने पुन्हा एकदा नवा विक्रम नोंदवला आहे. गेल्या २४ तासांत १ लाख ३१ हजार ९६८ नवे रुग्ण आढळले असून ७८० जणांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. तसेच ६१ हजार ८९९ जण कोरोनामुक्त झाले आहेत. त्यामुळे आता देशातील कोरोनाबाधितांची संख्या १ कोटी ३० लाख ६० हजार ५४२वर पोहोचली आहे. यापैकी आतापर्यंत १ लाख ६७ हजार ६४२ जणांचा मृत्यू झाला असून १ कोटी १९ लाख १३ हजार २९२ जण कोरोनामुक्त झाले आहेत. अशीच जर दररोज लाखोंनी नव्या रुग्णांची नोंद झाली तर भारत जगातील कोरोना यादीत ब्राझीलला मागे टाकत दुसऱ्या स्थानावर येईल.

- Advertisement -

केंद्रीय आरोग्यमंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, सध्या देशात ९ लाख ७९ हजार ६०८ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. आतापर्यंत ९ कोटी ४३ लाख ३४ हजार २६२ जणांचे लसीकरण पार पडले आहे. वर्ल्डोमीटरच्या आकडेवारीनुसार, सध्या ब्राझीममधील कोरोनाबाधितांची संख्या १ कोटी ३२ लाख ८६ हजार ३२४ इतकी आहे. यापैकी आतापर्यंत ३ लाख ४५ हजार २८७ जणांचा मृत्यू झाला असून १ कोटी १७ लाख ३२ हजार १९३ जण कोरोनामुक्त झाले आहेत. तसेच सध्या १ कोटी २० लाख ८ हजार ८४४ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. या आकडेवारीनुसार पाहायला गेले तर, भारतातील कोरोनामुक्त होण्याची संख्या ब्राझीलपेक्षा जास्त आहे.

दरम्यान देशात ८ एप्रिलपर्यंत २५ कोटी ४० लाख ४१ हजार ५८४ नमुन्यांच्या चाचण्या झाल्या आहेत. यापैकी आतापर्यंत १३ लाख ६४ हजार २०५ नमुन्यांच्या चाचण्या काल दिवसभरात झाल्या आहेत, अशी माहिती आयसीएमआरने दिली आहे.

- Advertisement -


हेही वाचा – Corona Update: चिंता वाढली! देशात फक्त ५ दिवस पुरेल इतकाच लसीचा साठा


 

Priyanka Shinde
Priyanka Shindehttps://www.mymahanagar.com/author/spriyanka/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रिय. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव. सोशल मीडियावर काम करण्याची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -