Eco friendly bappa Competition
घर देश-विदेश Corona Update: देशात कोरोनाचा हाहाकार, १० हजारांहून अधिक रुग्णांची नोंद तर २७...

Corona Update: देशात कोरोनाचा हाहाकार, १० हजारांहून अधिक रुग्णांची नोंद तर २७ जणांचा मृत्यू

Subscribe

देशात कोरोनाच्या रुग्णांचा आकडा पुन्हा एकदा वाढू लागला आहे. अशातच गेल्या २४ तासात कोरोनाचे १०,७५३ रुग्ण नव्याने आढळून आले असून २७ जणांचा मृत्यू झाला आहे. याच सोबत दररोजचा पॉझिटिव्ह रेट ६.७८ टक्के झाला आहे. हाच रेट शुक्रवारी ५.०१ टक्के होता. तर गेल्या सात दिवसात पॉझिटिव्हिटटी रेट बद्दल बोलायचे झाल्यास तर तो ४.४९ टक्के होता. काही राज्यांमध्ये कोरोनाच्या रुग्णांचा आकडा झपाट्याने वाढत आहे. यामुळे आरोग्यासंबंधित काळजी घेण्याचे आवाहन आरोग्य विभागाकडून करण्यात आले आहे.

शुक्रवार बद्दल बोलायचे झाल्यास तर देशात २९ लोकांचा मृत्यू झाला. सर्वाधिक रुग्णांच्या मृत्यूची नोंद (९) केरळातील आहे. दिल्लीत १५०० पेक्षा अधिक कोरोनाच्या रुग्णांची नोंद करण्यात आली. तर संक्रमणाचा दर २८ टक्के होता. दिल्लीत पॉझिटिव्हिटी रेट २७.७७ टक्के रेकॉर्ड केला गेला.

- Advertisement -

शुक्रवारी महाराष्ट्रात १ हजारांहून अधिक रुग्ण
राजधानी दिल्ली व्यतिरिक्त महाराष्ट्रात सुद्धा १०८६ रुग्णांची नोंद करण्यात आली. गेल्या २४ तासात एका रुग्णाचा मृत्यू झाला. राज्यात अॅक्टिव रुग्ण ५७०० असल्याचे सांगण्यात आले आहे. महाराष्ट्रात सर्वाधिक रुग्ण २७४ हे मुंबईत आढळले आहेत. दरम्यान, यामध्ये कोणाचाही मृत्यू झालेला नाही. कोरोनाच्या आतापर्यंत १९,७५२ रुग्णांचा बळी गेला आहे.

तर बुधवारी मुंबईत ३२० रुग्ण आढळले होते. सप्टेंबर २०२२ नंतर पहिल्यांदा मुंबईत ऐवढ्या रुग्णंची नोंद करण्यात आली. मुंबईत २४ तासात २७४ रुग्णांनी कोरोनावर मात केली. अॅक्टिव्ह रुग्ण १६०० पेक्षा अधिक झाले आहेत.

- Advertisement -

देशात कोविड रुग्णांमध्ये XBB.1.16 वेरियंट
भारतात मिळत असलेल्या कोरोना प्रकरणी बहुतांश केस हे नवा वेरियंट XBB.1.16 चे समोर येत आहेत. जीनोम सिक्वेंसिंगवर लक्ष ठेवणारी संस्था INSACOG च्या मते, देशात दररोज समोर येत असलेल्या कोरोना रुग्णांमध्ये ३८.२ टक्के केस हे नव्या वेरियंटचे आहेत.

XBB वेरियंट नक्की काय आहे?
XBB.1.16 कोरोनाचा सब वेरियंट ओमिक्रॉन वेरियंट असल्याचे सांगितले जात आहे. तज्ञांच्या मते, XBB.1.16, XBB.1.15 हा १४० टक्के वेगान पसरु शकतो. हा XBB.1.5 च्या तुलनेत अधिक आक्रमक आहे. खरंतर XBB.1.9 वेरियंट सुद्धा वेगाने फैलावत आहे. दरम्यान, कोरोनाच्या नव्या वेरियंटची लक्षणे यापूर्वी सारखीच आहेत. आतापर्यंत यामध्ये कोणतेही नवे लक्षण समोर आलेले नाही. वातावरणात बदल झाल्याने फ्लू ची प्रकरणे वाढली आहेत. अशातच कोरोनाचा आकडा ही वाढत आहे.

 


हेही वाचा: कोरोनाचा धोका वाढला; चीनसह ‘या’ 5 देशांमधून येणाऱ्यांसाठी RT-PCR चाचणी बंधनकारक

- Advertisment -