घरताज्या घडामोडीCorona Update : अमेरिकन दूतावासाकडून व्हिसा मुलाखती रद्द, रशियाची व्हिसा प्रक्रियेलाच स्थगिती

Corona Update : अमेरिकन दूतावासाकडून व्हिसा मुलाखती रद्द, रशियाची व्हिसा प्रक्रियेलाच स्थगिती

Subscribe

अमेरिकेच्या दूतवासानंतर रशियन दूतवासानेही व्हिसा प्रक्रिया काही दिवसांकरता रद्द केली

देशात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढला आहे. वाढत्या कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे देशात मोठ्या प्रमाणात कोरोनाबाधित रुग्णांची नोंद होत आहे. वाढत्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर परराष्ट्र मंत्रालयांनी मोठा निर्णय घेतला आहे. परराष्ट्र व्हिसा संबंधित सर्व कामे बंद ठेवण्यात आली आहेत. काही व्हिसा दूतवासाचे कर्मचारी कोरोना संसर्ग वाढल्याने पुन्हा आपल्या देशात परतणार आहेत. दिल्लीमधील अमेरिकेच्या दुतवासात व्हीसा प्रक्रिया, मुलाखती २० एप्रिल ते २५ एप्रिलपर्यंत बंद ठेवण्यात आले आहे. दिल्लीमध्ये लॉकडाऊन जाहीर केल्यामुळे हा निर्णय घेण्यात आला आहे. दिल्लीत वाढत्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ६ दिवसांचा लॉकडाऊन करण्यात आला आहे.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अमेरिकेच्या दूतवासाने ट्विट करत माहिती दिली आहे की, व्हिसा संबंधीत प्रकिया, मुलाखती, दस्तावेज पडताळणी स्थगित करण्यात आली आहे. तसेच व्हिसासाठी ठरविण्यात आलेल्या मुलाखती रद्द करण्यात येत आहेत. शुक्रवार २३ एप्रिल नंतर व्हिसा साठी मुलाखती घेण्यात येतील याबाबत पुन्हा कळविण्यात येईल असे ट्विट अमेरिकन एम्बेसीने केले आहे.

- Advertisement -

अमेरिकेच्या दूतवासानंतर रशियन दूतवासानेही व्हिसा प्रक्रिया काही दिवसांकरता रद्द केली आहे. कोरोना परिस्थिती नियंत्रणात आल्यावर पुन्हा कळविण्यात येणार असल्याचे ट्विट रशियन दूतवासाकडून करण्यात आले आहे.

- Advertisement -

कोरोनाच्या वाढत्या संसर्गामुळे ग्राहकांच्या आरोग्याचा विचार करता अमेरिकेचे मुंबईतील दूतवास बंद राहील. तसेच अमेरिकेच्या नागरिकांसाठी हे दूतवास नेहमीच्या कालावधीत सुरु असेल. अमेरिकेचे दूतवास दिल्ली, चेन्नई, हैद्राबाद आणि कोलकातामध्ये सुरु राहील. तसेच ज्या नागरिकांची मुलाखत रद्द करण्यात येईल त्यांना ई-मेलद्वारे माहिती दिली जाईल. तसेच ज्यांना मेल येणार नाही त्यांची व्हिसाबाबत मुलाखत ठरेलेल्या वेळेनुसार होणार असल्याचे अमेरिकेच्या दूतवासाकडून सांगण्यात आले आहे.

तसेच दूतवास स्थानिक कोरोनाच्या परिस्थितीवर मुलाखती घ्यायच्या की नाही याचा निर्णय घेणार आहेत. तसेच कोलकाता सर्व दूतवासात जनरल वाणिज्य दूतवासात विद्यार्थ्यांचे व्हिसा मर्यादित संख्येत मुलाखती घेण्यात येणार आहे. तरी मुलाखतीसाठीच्या तारखा प्रवासी नक्की निवडतील अशी आपेक्षा अमेरिकन दूतवासने व्यक्त केली आहे.

Swapnil Jadhav
Swapnil Jadhavhttps://www.mymahanagar.com/author/jswapnil/
मागील तीन वर्षापासून डिजिटल मीडिया क्षेत्रात सक्रिय आहे. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. डिजिटल मीडियाचा अनुभव, वार्ताहर, अँकरिंगचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -