Thursday, May 13, 2021
27 C
Mumbai
घर CORONA UPDATE क्या बात है! 'या' देशाने केवळ १६ दिवसात पूर्ण केली ९३ टक्के...

क्या बात है! ‘या’ देशाने केवळ १६ दिवसात पूर्ण केली ९३ टक्के लसीकरण प्रक्रिया

भुतानमध्ये २७ मार्चपासून लसीकरणाची सुरुवात करण्यात आली.

Related Story

- Advertisement -

कोरोनाच्या पहिल्या लाटेतून जग सावरत नाही तोवर दुसरी लाट समोर येऊन ठेपली. मात्र या लाटेत कोरोनाशी लढण्यासाठी कोरोनाची लस आपल्याकडे आहे. संपूर्ण जगभरात कोरोना लसीकरणाची प्रक्रिया सुरु झाली आहे. भारताप्रमाणे जगातील इतर देशातही कोरोना लसीकरणाला जोरदार सुरुवात झाली आहे. मात्र सर्व देशातील लसीकरणांमध्ये भुतान या देशाने बाजी मारली आहे. केवळ १६ दिवसांमध्ये भुतानने लसीकरणावर चांगलाच जोर धरला. भुतानने १६ दिवसातच ९३ टक्के लसीकरण पूर्ण केले आहे. भुतानमध्ये २७ मार्चपासून लसीकरणाची सुरुवात करण्यात आली. भुतानची एकूण लोकसंख्या ही ८ लाखांइतकी आहे. त्यातील ६२ टक्क्यांपर्यंत लोकांनी आतापर्यंत कोरोना लस घेतली आहे. भुतान हा जगातील पहिला देश आहे जो कोरोना लसीकरणाच्या शेवटच्या टप्प्यात आहे.

भुतान देशाला भारताने एस्ट्राजजेनेका लसीचे पहिले दीढ लाख डोस देण्यात आले होते. भुतानमध्ये मोठ्या प्रमाणात सुरु असलेल्या लसीकरणाचे श्रेय तिथे काम करणाऱ्या स्वयंसेवकांना दिले जात आहे. भुतानमध्ये बौद्ध प्रार्थनास्थळावर एका ठराविक मुहूर्तावर एका महिलेला कोरोना लस देऊन लसीकरणाची सुरुवात केली होती. भुतानमध्ये ९१० कोरोनाबाधित रुग्ण समोर आले आहेत. भुतानमध्ये येणाऱ्या प्रत्येक नागरिकाला २१ दिवस क्वारंटाईन करण्यात येत आहे. भुतानमधील शाळा त्याचप्रमाणे शैक्षणीक संस्थांच्या ठिकाणी कोविड १९ प्रोटोकॉलनुसार काळजी घेण्यात येत आहे.

- Advertisement -

जगभरात कोरोनाची दुसरी लाट आली असली तरी कोरोना लसीमुळे रुग्णांना दिलासा मिळाला आहे. मात्र तरीही जगभरात दिवसेंदिवस कोरोनाचे नवीन रुग्ण समोर येत आहेत. देशात गेल्या २४ तासात १ लाखांहून अधिक रुग्णांची नोंद झाली आहे. गेल्या काही दिवसांमध्ये देशातील ही सर्वांत मोठी रुग्णवाढ असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे आता पुन्हा एकदा देशासह राज्यांची परिस्थितीही चिंताजनतक होत असल्याचे चित्र आहे.


हेही वाचा – Maha Kumbh 2021: कुंभ मेळ्यात शाही स्नानादरम्यान सोशल डिस्टन्सिंगचे तीन-तेरा!
- Advertisement -