Sunday, July 25, 2021
27 C
Mumbai
my-mahanagar-most-viewed-video
घर देश-विदेश कोरोना लसीमुळे बळींच्या आकड्यात घट; मात्र डेल्टा व्हेरिएंटपासून सतर्क राहणे आवश्यक- जो...

कोरोना लसीमुळे बळींच्या आकड्यात घट; मात्र डेल्टा व्हेरिएंटपासून सतर्क राहणे आवश्यक- जो बायडन

Related Story

- Advertisement -

जगभरात गेल्या दीड वर्षांपासून कोरोनाचा कहर सुरू असून पूर्णतः त्याचा संसर्ग नाहिसा झालेला नाही. कोरोनाचा प्रादुर्भाव नियंत्रणात यावा, यासाठी प्रत्येक देश त्यांच्या लोकसंख्येनुसार कोरोना लसीकरण मोहीम राबवित आहे. दरम्यान, लसीकरण मोहिमेमुळे देशात कोरोनाची लागण झाल्याने होणाऱ्या मृत्यूची संख्या लक्षणीय घट झाली आहे, परंतु कोरोनाच्या ‘डेल्टा’ व्हेरिएंटबद्दल देशाने सतर्क राहण्याची आवश्यकता असल्याचे अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडन यांनी सांगितले. बायडेन यांनी लोकांना लस घेणं आवश्यक असून कोरोनामुळे मृत्यू झालेल्या आणि रूग्णालयात दाखल झालेले बहुतेक रूग्णांनी कोरोनाची लस घेतली नसल्याने त्यांच्यावर ही वेळ आली असल्याचे त्यांनी सांगितले.

‘डेल्टा’ व्हेरिएंट हा वेगाने पसरत चालला असून गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये भारतात हा व्हेरिएंट आढळला होता. मात्र आता तो जगभरात वेगाने पसरत आहे. ‘डेल्टा’ व्हेरिएंट अमेरिकेच्या काही भागात संसर्ग होण्याच्या ८० टक्के नवीन रूग्णांचे कारण आहे. मंगळवारी आपल्या प्रशासनाच्या सहा महिन्यांनंतर मंत्रिमंडळाच्या दुसऱ्या बैठकीत बायडेन म्हणाले की, कोविड कोरोनामुळे झालेल्या मृत्यूची संख्या झपाट्याने कमी झाली आहे आणि लसीकरण कार्यक्रमामुळे मृत्यू झालेल्यांच्या संख्येत जवळपास ९० टक्के घट झाली आहे.

- Advertisement -

बायडन यांनी असेही सांगितले की, कोरोनाच्या मृत्यूमध्ये जरी घट झाली असून डेल्टा व्हेरिएंटचा फैलाव होत असल्याने त्यापासून सतर्क राहणे आवश्यक आहे. कोरोनाबाधितांची संख्या वाढत असून ज्यांनी कोरोनाची लस घेतली नाही त्यांना त्यांचा मृत्यू झाला असल्याचे त्यांनी सांगितले तसेच लस न घेतल्यामुळे त्यांना रूग्णालयात दाखल करण्यात आल्याचे देखील सांगि्तले. त्यामुळे कोरोनापासून बचाव व्हावा, यासाठी कोरोनाची लस घेणं आवश्यक आहे. यासह ज्यांनी कोरोनाची लस घेतली नाही त्यांनी आवर्जून स्वतःचे कोरोना लसीकरण प्राधान्याने करून घेण्याचे आवाहन देखील केले.


 

- Advertisement -