घरताज्या घडामोडीCorona Vaccination: देशभरात वेगवान लसीकरण! ११४ दिवसांत १७ कोटींचा टप्पा केला पार

Corona Vaccination: देशभरात वेगवान लसीकरण! ११४ दिवसांत १७ कोटींचा टप्पा केला पार

Subscribe

देशात कोरोना प्रादुर्भाव दिवसगणिक वाढता दिसत आहे. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने देशभरात थैमान घातले असून कोरोनाबाधितांच्या संख्येत झपाट्याने वाढत आहे. मागील काही दिवसांपासून ४ लाखांहून अधिक कोरोनाबाधितांची नोंद होत होती, मात्र आज कोरोनाबाधितांच्या संख्येत किचिंत घट झाली असून ३ लाखांहून अधिक रुग्णांची नोंद झाली आहे. तसेच सध्या कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्यामुळे लसीकरणावर अधिक भर देण्यात आला आहे. आता देशातील कोरोना लसीकरणाने १७ कोटींचा टप्पा पार केला आहे.

केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, देशात ११४ दिवसात १७ कोटी लसीकरण पार पडले आहे. तर चीन आणि अमेरिकेत अनुक्रमे ११९ दिवसांत आणि ११५ दिवसांत १७ कोटी कोरोना लसीकरण पार पडले आहे. म्हणजेच भारताने या दोन्ही देशांपेक्षा अधिक वेगवान लसीकरण राबवले आहे.

- Advertisement -

देशात आतापर्यंत १७ कोटी १ लाख ७६ हजार ६०३ जणांचे लसीकरण झाले आहे. दरम्यान देशात २४ तासांत ३ लाख ६६ हजार १६१ नव्या कोरोनाबाधितांची नोंद झाली असून ३ हजार ७५४ रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. तर ३ लाख ५३ हजार ८१८ रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. देशातील कोरोनाबाधितांची एकूण संख्या २ कोटी २६ लाख ६२ हजार ५७५वर पोहोचली आहे. यापैकी आतापर्यंत २ लाख ४६ हजार ११६ जणांचा मृत्यू झाला असून १ कोटी ८६ लाख ७१ हजार २२२ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. सध्या ३७ लाख ४५ हजार २३७ रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

- Advertisement -

हेही वाचा – २०१५ पासून चीनची कोरोना विषाणूच्या निर्मितीची तयार सुरू, ‘द वीकेंड ऑस्ट्रेलियन’चा दावा


 

Priyanka Shinde
Priyanka Shindehttps://www.mymahanagar.com/author/spriyanka/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रिय. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव. सोशल मीडियावर काम करण्याची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -