corona Vaccination: 15-18 वयोगटातील मुलांचे लसीकरण मिशन मोडवर, PM मोदी घेणार राज्यांच्या मुख्यमंत्र्यांची बैठक

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर तातडीची आढावा बैठक घेतली होती. या बैठकीला केंद्रीय आरोग्य सचिव, आरोग्य विभाग, केंद्रीय आरोग्य मंत्री मनसुख मांडवीय, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि इतर वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

corona Vaccination PM Narendra Modi Review Meeting teenage child vaccination on mission mode in country
corona Vaccination: 15-18 वयोगटातील मुलांचे लसीकरण मिशन मोडवर, PM मोदी घेणार राज्यांच्या मुख्यमंत्र्यांची बैठक

देशात कोरोना परिस्थिती दिवसेंदिवस खराब होत चालली आहे. कोरोनाबाधितांची संख्या वाढली असल्यामुळे देशातील नागरिकांच्या लसीकरणावर जास्त भर दिला जात आहे. कोरोना प्रतिबंधक लसीच्या एक आणि दुसऱ्या डोसनंतर आता ज्येष्ठ नागरिकांना तिसरा लसीचा डोस देण्यास सुरुवात करण्यात आली आहे. तसेच १५ ते १८ वयोगटातील मुलांच्या लसीकरणाला सुरुवात झाली आहे. मुलांचे लसीकरण मीशन मोडवर करण्याच्या सूचना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यंत्रणांना दिल्या आहेत. आरोग्य कर्मचारी आणि फ्रंटलाईन वर्कर्स कोरोनाच्या काळात उत्तम सेवा देत आहेत त्यांचेही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आभार मानले आहेत. त्यांनाही तिसऱ्या डोसचे लसीकरण वेगाने करण्याच्या सुचना दिल्या आहेत.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील कोरोना परिस्थितीचा आढावा घेतला आहे. राज्यांमध्ये कोरोना रुग्णांचे आकडे वाढत असल्यामुळे पंतप्रधान लवकरच सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांची बैठक घेतील. तसेच कोरोना महामारीविरोधात लढण्यासाठी लसीकरण गरजेचे आहे. कोरोनाच्या तिसऱ्या लाटेमध्ये मुलांना जास्त धोका असल्यामुळे १५-१८ वयोगटातील मुलांचे लसीकरण सुरु करण्यात आले आहे. या मुलांचे लसीकरण वेगाने करण्यात यावे तसेच मिशन मोडवर लसीकरण करण्याच्या सूचना मोदींनी दिल्या आहेत. मुलांच्या लसीकरणाचाही पंतप्रधानांनी आढावा घेतला आहे.

कोरोना परिस्थितीच्या आढावा बैठकीनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी ट्विट करत म्हणाले की, कोरोना परिस्थितीच्या आढावा बैठकीमध्ये सखोल चर्चा करण्यात आली. आरोग्य संबंधित विषयांवरील उपाययोजना तसेच लसीकरणाची तयारी, १५-१८ वयोगटातील मुलांच्या लसीकरणाबाबत आढावा घेतला. कोरोना आरोग्य सेवा सुरु ठेवण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत. देशातील कोरोना परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर टेलीमेडिसिनची सुविधा वाढवावी असे पंतप्रधान म्हणाले आहेत. देशातील कोरोना संबंधी समस्यांवर निराकरण करण्यासाठी टेलीमेडिसिन सुविधा उपयुक्त ठऱेल, रुग्णांना घरबसल्या डॉक्टरांकडून ऑनलाईन सल्ला मिळेल असे पंतप्रधान म्हणाले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर तातडीची आढावा बैठक घेतली होती. या बैठकीला केंद्रीय आरोग्य सचिव, आरोग्य विभाग, केंद्रीय आरोग्य मंत्री मनसुख मांडवीय, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि इतर वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.


हेही वाचा : Maharashtra Corona Update: राज्यात रविवारी 44,388 नव्या कोरोना रुग्णांची नोंद, तर 206 ओमिक्रॉनबाधित