घरCORONA UPDATECorona Vaccination For Children : देशात १ जानेवारीपासून लहान मुलांच्या लसीकरण नोंदणीला...

Corona Vaccination For Children : देशात १ जानेवारीपासून लहान मुलांच्या लसीकरण नोंदणीला सुरुवात

Subscribe

जगभरात ओमिक्रॉन विषाणूचे संकट वाढत आहे. याचपार्श्वभूमीवर भारतात ३ जानेवारीपासून १५ ते १८ वयोगटातील मुलांच्या लसीकरणाला सुरुवात होणार आहे. लहान मुलांच्या लसीकरण नोंदणीला आता १ जानेवारी २०२२ पासून सुरुवात होत आहे. कोव्हिन अॅपवरून रजिस्ट्रेशन करुन प्रौढांनी जशी लस घेतली त्याचप्रमाणे मुलांनाही लस दिली जाणार आहे. त्यामुळे १५ ते १८ वयोगटातील मुलांना शाळेचे ओळख पत्र कोव्हिन अॅपवर अपलोड करुन लसीकरणासाठी रजिस्ट्रेशन करता येणार आहे. या मुलांना कोवॅक्सिन आणि झायडस कॅडिला लसींपैकी कोणतीही एक लस दिली जाईल.

कोव्हिन अॅपचे एम्पावर्ड कमिटीचे चेअरमन आरएस शर्मा यांनी सांगितले की, शक्यतो काही मुलांचे आधार कार्ड काढलेले नसते त्यामुळे त्यांना शाळेच्या ओळख पत्रावर लस दिली जाईल. लहान मुलांच्या लसीकरणासाठी भारतीय अन्न आणि औषध प्रशासनाने अलीकडेच कोवॅक्सिन लसीला आपातकालीन वापराला मंजुरी दिली होती. यानंतर सुई विना देण्यात येणाऱ्या झायडस कॅडिलाच्या झायकोव-डी लसीलाही परवानगी देण्यात आली.

- Advertisement -

ओमिक्रॉनच्या वाढत्या रुग्णसंख्येमुळे संभाव्य तिसरी लाटेचा धोका लक्षात घेता पंतप्रधान नरेंद्र मोदींनी २५ डिसेंबरला मुलांच्या लसीकरणाची घोषणा केली. यात त्यांनी ३ जानेवारीपासून देशात १५ ते १८ वयोगटातील मुलांचे लसीकरण केले जाईल असे घोषित केले. तर १० जानेवारीपासून देशातील प्रौढ नागरिक, फ्रंटलाईन वर्कर, सुरक्षा कर्मचारी आणि ६० वर्षावरील गंभीर आजारीने पीडित व्यक्तींना लसीचा अतिरिक्त डोस देणार असल्याचे जाहीर केले. या डोसला बूस्टर डोस असे नाव न देता Precaution Dose असे नाव दिले.


Coronavirus: ‘या’ प्राण्यामुळे जन्माला येणार कोरोनाचा नवा व्हेरिएंट; शास्त्रज्ञांचा दावा


sushma rane
sushma ranehttps://www.mymahanagar.com/author/sushma-rane/
गेली ४ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -