घरताज्या घडामोडीCorona Vaccination: १८ ते ४४ वयोगटाचे लसीकरण सप्टेंबरपासूनच, या मुख्यमंत्र्याचा कठोर निर्णय

Corona Vaccination: १८ ते ४४ वयोगटाचे लसीकरण सप्टेंबरपासूनच, या मुख्यमंत्र्याचा कठोर निर्णय

Subscribe

राज्यात सध्या ४५ वर्षांवरील नागरिकांचे लसीकरण सुरु

देशात तिसऱ्या टप्प्यातील कोरोना लसीकरण येत्या १ मे पासून सुरु करण्यात येत आहे. यामध्ये १८ ते ४४ वर्षांमधील नागरिकांचे लसीकरण करण्यात येणार आहे. १८ ते ४४ वर्षांमधील नागरिकांचे लसीकरण करण्याची जबाबदारी संबंधित राज्य सरकारवर केंद्र सरकारने टाकली आहे. त्यामुळे आता येत्या १ मे पासून सर्व राज्यात १८ वर्षांवरील नागरिकांचे लसीकरण करण्यात येत आहे. परंतु आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री जगनमोहन रेड्डी यांनी सांगितले आहे की, १८ ते ४४ वयोगटातील नागरिकांचे लसीकरण सप्टेंबरमध्ये सुरु होण्याची शक्यता आहे. सध्या ४५ वर्षांवरील नागरिकांचे कोरोना लसीकरण वेगाने करण्यात येणार आहे. असे आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री जगन मोहन रेड्डी यांनी म्हटले आहे.

आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री जगन मोहन रेड्डी यांनी राज्यातील कोरोना परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी मंत्रिमंडळाची बैठक आयोजित केली होती. या बैठकीत राज्यातील कोरोना परिस्थितीचा आढावा आणि कोरोना लसीकरणाबाबत निर्णय घेण्यात आला आहे. राज्यात सध्या ४५ वर्षांवरील नागरिकांचे लसीकरण सुरु आहे. केंद्र सरकारकडून लसींचा पुरवठा कमी प्रमाणात सुरु असल्यामुळे ४५ वर्षांवरील नागरिकांचे लसीकरण करण्यात येईल, या नागरिकांचे लसीकरण पुढील ४ महिन्यांत पुर्ण होण्याची शक्यता आहे. त्यामुळे सप्टेंबरपासून १८ ते ४४ वर्षांवरील नागरिकांचे लसीकरण करण्यात येणार आहे.

- Advertisement -

१८ ते ४४ वर्षांवरील नागरिकांचे कोरोना लसीकरण सप्टेंबरमध्ये सुरु करणार असल्याची घोषणा करणारे आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री जगन मोहन रेड्डी हे पहिलेच ठरले आहेत. सप्टेंबरमध्ये १८ ते ४४ वर्षांचे कोरोना लसीकरण सुरु केल्यास जानेवारी २०२२ पर्यंत पुर्ण होण्याची शक्यता असल्याचेही मुख्यमंत्र्यांनी म्हटले आहे. लस उत्पादन करणाऱ्या कंपन्यांकडून लसींचा पुरवठा कमी प्रमाणात होत असल्यामुळे असा निर्णय घेण्यात आला आहे.

मुख्यमंत्री जगनमोहन रेड्डी यांनी म्हटले आहे की, सध्या देशात महिना ७ कोटी कोरोना लसींची उत्पादन करण्याची क्षमता आहे. यामध्ये १ कोटी कोवॅक्सिन आणि ६ कोटी कोव्हिशिल्ड त्यामुळे ४५ वर्षांवरील नागरिकांना कोरोना लसीकरणात व्यत्यय येत आहे. अजून ३९ कोटी नागरिकांना कोरोना लसीकरण करणे बाकी आहे. देशात अनेक लस उत्पादित कंपन्या ४ महिन्यांत सुरु करण्यात येत आहेत. त्यामुळे सप्टेंबरपासून कोरोना १८ ते ४४ वर्षांमधील नागरिकांचे लसीकरण होण्याची शक्यता आहे.

Swapnil Jadhav
Swapnil Jadhavhttps://www.mymahanagar.com/author/jswapnil/
मागील तीन वर्षापासून डिजिटल मीडिया क्षेत्रात सक्रिय आहे. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. डिजिटल मीडियाचा अनुभव, वार्ताहर, अँकरिंगचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -