घरताज्या घडामोडीcorona vaccine कोरोना लस बनवणारी 'सिरम आणि भारत बायोटेक कंपनी' चीनी हॅकर्सच्या...

corona vaccine कोरोना लस बनवणारी ‘सिरम आणि भारत बायोटेक कंपनी’ चीनी हॅकर्सच्या निशाण्यावर

Subscribe

चीनच्या एका हॅकर्स समूहाने कोरोना लस बनवणाऱ्या सिरम (SII) आणि भारत बायोटेक कंपन्याच्या आयटी सिस्टीमलाच टार्गेट केल्याचं समोर आलं आहे.

गेल्या वर्षी मुंबईमध्ये वीजपुरवठा खंडित होण्यामागे चीनी हॅकर्सचा हात होता असा खळबळजनक दावा अमेरिकेच्या ‘द न्यूयॉर्क टाईम्स’ने केला आहे. त्यानंतर आता अजून एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. यामाहितीनुसार चीनच्या एका हॅकर्स समूहाने कोरोना लस बनवणाऱ्या सिरम (SII) आणि भारत बायोटेक कंपन्याच्या आयटी सिस्टीमलाच टार्गेट केल्याचं समोर आलं आहे. रॉयटर्स या वृत्तसंस्थेने ही माहिती दिली आहे.

रॉयटर्सने सायबर इंटेलिजन्स फर्म ‘सायफिरमा’ च्या हवाल्याने ही माहिती दिली आहे. चीनी हॅकर्सने कंपनीची आयडी सिक्युरिटीच हॅक करण्याचा प्रयत्न केल्याचे सांगण्यात येत आहे. सिंगापूर आणि टोकियोमधील गोल्डमन सैक्सच्या ‘सायफिरमा’ने दिलेल्या माहितीनुसार APT10 हा चीनी हॅकर्सचा समूह आहे. ज्याला स्टोन पांडा नावानेही ओळखले जाते. या हॅकर्सने भारत बायोटेक आणि सिरम इन्स्टीट्यूट ऑफ इंडीयाच्या आयटी इन्फ्रास्ट्रक्चर आणि सप्लाय चेन सॉफ्टवेयरमधील त्रुटी शोधण्याचा प्रयत्न केला होता. त्यातच सिरम अनेक देशांसाठी एस्ट्राजेनेका नावाची लस तयार करत असून लवकरच नोवाक्सैक्स शॉट्सची निर्मिती करणार आहे. यामुळे या कंपन्यांवर चीन हॅकर्स लक्ष ठेवून आहेत. भारत आणि चीन हे दोन्ही देश अनेक देशांना कोरोना लसीचा पुरवठा करत आहे. त्यातही अनेक देशांनी चीनची लस नाकारून भारताच्या लसींना प्राधान्य दिले आहे.

Kavita Joshi - Lakhehttps://www.mymahanagar.com/author/lkavita/
गेली १३ वर्ष पत्रकारितेत. सामाजिक विषयांवर लिखाण. ब्लॉग्जवरही लेखन. प्रिंट, डिजिटल मीडिया क्षेत्राचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -