घरदेश-विदेशCovid-19: १२ ते १५ वर्षांच्या मुलांसाठी लस उपलब्ध; १०० टक्के प्रभावी असल्याचा...

Covid-19: १२ ते १५ वर्षांच्या मुलांसाठी लस उपलब्ध; १०० टक्के प्रभावी असल्याचा Pfizer चा दावा

Subscribe

जगभरासह देशात कोरोनाचा कहर सुरू आहे. देशात कोरोनाचा प्रादुर्भाव नियंत्रित करण्यासाठी मोठ्या प्रमाणात कोरोना लसीकरण मोहीम सुरू आहे. कोरोना व्हायरसच्या संसर्गाचे प्रमाण प्रौढांसह वयोवृद्धामध्ये अधिक आहे. मात्र गेल्या काही दिवसांपूर्वी तरूणांसह लहान मुलांना देखील कोरोनाने आपल्या विळख्यात घेतल्याचे सांगितले जात आहे. आशा परिस्थितीत एक दिलासादायक बातमी समोर आली आहे. ती म्हणजे अमेरिकन लस उत्पादक फायझर इंक आणि बायोएनटेक एसई या कंपन्यांनी नुकतीच १२ वर्षाखालील मुलांसाठी कोरोना लसीचे ट्रायल सुरू केले आहे. सध्या अमेरिकेत १६ वर्षांपेक्षा जास्त वयाच्या तरुणांना फायझरची लस दिली जात आहे. मात्र आता फायझर इंक आणि बायोएनटेक एसई कंपनीची कोरोना लस २ वर्षाखालील मुलांना दिली जात आहे. यासह १२ ते १५ वर्षे वयोगटातील मुलांसाठी ही लस १०० टक्के प्रभावी असल्याचा दावा कंपनीने केला आहे.

- Advertisement -

दरम्यान कंपनीला अशी अपेक्षा आहे की, या कोरोना लसीकरणाचे वय २०२२ पर्यंत वाढविण्यात येईल. सध्या ४५ वर्षाहून अधिक वय असणाऱ्या नागरिकांना आणि फ्रंटलाइन वॉरियर्सना भारतात लसीकरण मोहीम सुरू आहे. गेल्या आठवड्यात मोडर्ना इंक कंपनीने देखील अशीच एक चाचणी सुरू केली होती. तर सध्या फायझरच्या कोरोना लसीची चाचणी १२ वर्षांपेक्षा कमी व ६ महिन्यांपर्यंतच्या मुलांवर केली जात आहे. गेल्या आठवड्यातही मॉडर्ना इंककडून अशाप्रकारची चाचणी सुरू करण्यात आली होती.

जगात कोरोनाचा कहर पुन्हा वेगाने वाढत आहे. भारतातही कोरोना थैमान घालताना दिसतोय. यासह कोरोनाविरूद्ध लढण्यासाठी देशात लसीकरण मोहीम राबविली जात असली तरी, अद्याप लहान मुलांना कोरोनाची लस टोचण्यास परवानगी देण्यात आलेली नाही. कोव्हॅक्सिन आणि कोव्हिशील्ड या लसी नागरिकांना देऊन भारतात मोठ्या प्रमाणात लसीकरण मोहीम राबविली जात आहे.


Harshada Shinkarhttps://www.mymahanagar.com/author/sharshada/
गेल्या ५ वर्षांपासून प्रिंट आणि डिजिटल मीडिया क्षेत्राचा अनुभव. लाईफ स्टाईल, फॅशन, महिलांसंबधित विषयावर लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -