Sunday, May 9, 2021
27 C
Mumbai
घर देश-विदेश corona vaccine: कोरोना विरोधी लढा होणार तीव्र, sputnik v लस १ मे...

corona vaccine: कोरोना विरोधी लढा होणार तीव्र, sputnik v लस १ मे ला भारतात होणार दाखल

Related Story

- Advertisement -

देशात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने हाहाकार माजवला आहे. परंतु या कोरोना विषाणूविरोधात लढण्यासाठी देशात कोरोना लसीकरण मोहिम अगदी वेगाने सुरु झाली आहे. दरम्यान भारतात रशियाची स्तूपनिक ही तिसरी लस १ मे रोजी दाखल होणार आहे. रशियातील रिसर्च समुहाचे प्रमुख किरिल दमित्रिव यांनी एका मुलाखतीमध्ये याबाबतची माहिती दिली आहे.

दरम्यान भारतात १ मे रोजी स्पूतनिक लसीचे ५ कोटी डोस आयात होणार असल्याची माहिती समोर येत आहे. औषध निर्मिती क्षेत्रातील कंपनी डॉ. रेड्डीज लॅबोरेटरीजच्या माध्यामातून या लसीचे डोस भारतात आयात होत असून काही दिवसांनंतर या लसीला भारतात निर्मितीसाठी जागा उपलब्ध करु दिली जाणार आहे. डॉ. रेड्डीज लॅबोरेटरीज या लसीची निर्मिती आणि वितरण करणार आहे.

- Advertisement -

स्पूतनिक वी ही लस कोविशील्ड आणि कोव्हॅक्सिन लसीच्या तुलनेत अधिक प्रभावी असल्याचे मानले जाते,
मॉस्कोतील गॅमालिया इन्स्टिट्युटद्वारे ही लस विकसित करण्यात आली आहे. मात्र, आता ही लस ९१.६ टक्के प्रभावी असल्याचं समोर आलं आहे. तर कोविशिल्ड ही तुलनेत ८० टक्के आणि कोवॅक्सिन ही लस ८१टक्केच प्रभावी असल्याचे समोर येत आहे. स्पूतनिक या लसीला विकसित करण्यासाठी सर्दीच्या विषाणूचा वापर करण्यात आला आहे.

भारतात सध्या कोरोनाविरुद्धच्या लढाईत अॅस्ट्राझेनिका आणि ऑक्सफर्ड विद्यापीठाने विकसित केलेली आणि पुण्याच्या सीरम इन्स्टिट्युटने उत्पादित केलेली कोविशिल्ड ही लस दिली जात आहे. तर हैदराबादच्या भारत बायोटेकने विकसित केलेली कोवॅक्सिनही (Corona Vaccine) लसीकरण मोहिमेत नागरिकांना दिली जात आहे. परंतु स्पूतनिक ही तिसरी लस भारतात दाखल झाल्याने लसीकरण मोहिम अधिक वेगाने होण्यास मदत होणार आहे. दरम्यान देशात प्रत्येक महिन्यात ७० मिलियन डोस बनवण्याची योजना आखली जात आहे.

- Advertisement -

नागरिकांना या लसीचे दोन डोस घ्यावे लागतील. पहिला डोस घेतल्यानंतर 21 दिवसांनी दुसरा डोस घ्यावा लागेल. लस घेतल्यानंतर 28 आणि 42 दिवसांमध्ये शरीरात रोगप्रतिकारक शक्ती विकसित होण्यास सुरुवात होईल. त्यामुळे लसीचे दोन डोस घेणं आवश्यक असणार आहे. ‘स्पुटनिक V ‘ चे लसीकरण सुरु झाल्यानंतर रशिया सरकारने आपल्या नागरिकांना दोन महिने दारुचे सेवन न करण्याचा सल्ला दिलाय.


Corona दुसरी लाट ओसरताच आरोग्य विभागाचे प्रधान सचिव डॉ प्रदीप व्यास यांची बदली


 

- Advertisement -