लाखोंचे बिल आता विसरा; अवघ्या २२५ मध्ये मिळणार कोरोनाची लस!

पुणे सीरम इन्स्टिट्युटने जाहीर केली किंमत

corona vaccine
लस

कोरोना व्हायरसवर लवकरात लवकर लस तयार व्हावी आणि ती नागरिकांना एकदी कमी पैशात मिळावी यासाठी प्रयत्न सुरूच आहेत. फक्त भारतात नाही तर जगातील गरीब, कमी आणि मध्यम उत्पन्न असलेल्या देशांना परवडणारी अशी लस उपलब्ध करून देण्याचा भारताचा प्रयत्न आहे आणि त्या दिशेनं आता पुण्याच्या सीरम इन्स्टिट्युट ऑफ इंडियाने आणखी एक पाऊल उचललं आहे. सीरम इन्स्टिट्युटच्या या निर्णयानंतर सर्वसामान्य नागरिकांना दिलासा मिळाला आहे.

कारण सध्या सर्वसामान्य नागरिकांना कोरोना होणं हे परवडणारं नाहीये असच दिसतय. कारण एकीकडे सरकारी हॉस्पिटलची झालेली दुरावस्था तर दुसरीकडे खासगी हॉस्पिटलमध्ये येणारं अव्वाच्या सव्वा बीलं सर्वसामान्यांच्या अवाक्याबाहेर आहेत. त्यामुळे कोरोनावर लस कधी येणार याकडे सर्वसामान्यांच लक्ष आहे. बरं त्यातून कोरोनावर तयार झालेली लस आपल्याला परवडेल की नाही हा वेगळा प्रश्न सध्या सगळ्यांना भेडसावत आहे. पण आता काळजी करायची गरज नाही कारण पुण्याच्या सीरम इन्स्टिट्युट ऑफ इंडियाने सर्वसामान्यांना परवडेल अशा किंमतीत लसीचे उत्पादन करण्याचा निर्णय घेतला आहे.

सीरम इन्स्टिट्युट (GAVI) ही आंतरराष्ट्रीय लस संस्था आणि बिल अँड मेलिंडा गेट्स फाऊंडेशन एकत्र आले आहेत. बिल अँड मेलिंडा गेट्स फाऊंडेशन कोरोना लसीसाठी १५० मिलियन डॉलर्सचा निधी देणार आहे. GAVI मार्फत हा निधी सीरम इन्स्टिट्युटला कोरोना लसीच्या उत्पादनासाठी दिला जाईल. २०२१ पर्यंत जवळपास १००  दशलक्ष डोस पुरवणार आहे. या लसीची किंमत जास्तीत जास्त ३ यूएस डॉलर म्हणजे फक्त २२५ रूपये आहेत. सीरम इन्स्टिट्युट ऑफ इंडिया ही रोगप्रतिकारक औषधं निर्माण करणारी कंपनी आहे.

जगभरात सध्या जवळपास १४० कोरोना लसींवर काम सुरू आहे. सीरम इन्स्टिट्युटनेही ऑक्सफर्ड-AstaZeneca आणि अमेरिकेच्या Novavax या कंपनीसह लशीबाबत करार केला आहे. या लसींचं ट्रायल यशस्वी झालं, त्याला परवानगी मिळाली. तर सीरम इन्स्टिट्युटला या लशीच्या उत्पादनासाठी हा निधी मिळणार आहे.


हे ही वाचा – मोठी बातमी! १ सप्टेंबरपासून शाळा सुरू, केंद्र सरकार निर्णयाच्या तयारीत!