Sunday, May 9, 2021
27 C
Mumbai
घर देश-विदेश CoronaVaccine: जुलैपर्यंत लसीची कमतरता? पूनावाला म्हणाले, 'विचारही नव्हता केला, वर्षात १ अब्ज...

CoronaVaccine: जुलैपर्यंत लसीची कमतरता? पूनावाला म्हणाले, ‘विचारही नव्हता केला, वर्षात १ अब्ज डोस तयार करावे लागतील’

Related Story

- Advertisement -

देशात कोरोनाचा फैलाव झपाट्याने होत असून कोरोनावर मात करण्यासाठी भारताने प्रत्येकासाठी लसीकरण सुरू केले आहे. असे असले तरी मात्र लसींची भासणारी कमतरता हे देशातील सर्वात मोठं संकट आहे. देशाच्या बर्‍याच राज्यात कोरोना लस नसल्यामुळे लसीकरण केंद्रे बंद करण्यात आली आहे. त्यामुळे लसीकरणाचा पुढचा टप्पा सुरू झालेला नाही. दरम्यान, भारतातील सर्वात मोठी लस उत्पादक कंपनी सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाच्या अदार पूनावाला यांनी एक वक्तव्य केले आहे. यामुळे लसींच्या कमतरतेची चिंता आणखी गडद झाली आहे.

अदार पूनावाला म्हणाले की, भारतात लसीची कमतरता जुलैपर्यंत कायम भासू शकते. इंडियन एक्सप्रेसने दिलेल्या माहितीनुसार, जुलैमध्ये लस उत्पादन वाढून दरमहा १०० दशलक्ष लसींचे डोस तयार केले जातील, असे त्यांनी एका मुलाखतीत सांगितले. भारतातील प्रत्येकाला असे वाटले होती की, कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाला आहे. मात्र जानेवारी महिन्यात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने पुन्हा देशाची चिंता वाढवली. यावेळी त्यांनी असेही सांगितले की, कोरोना लसीच्या कमतरतेबाबत माझ्यावर चुकीचे आरोप केले जात आहे. अदार पूनावाला म्हणाले की, यापूर्वी कोरोना लस बनविण्याची क्षमता आम्ही वाढविली नव्हती, कारण त्यावेळी भरपूर मागणी नव्हती. आम्ही कधी विचारही नव्हता केला , आम्हाला एका वर्षात १ अब्ज डोस तयार करावे लागतील.

- Advertisement -

सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया ही जगातील सर्वात मोठी लस उत्पादक कंपनी म्हणून देशांमध्ये गणली जाते. भारतात ही कंपनी कोव्हिशील्ड लसीची निर्मिती करीत आहे. अलीकडेच अदार पूनावाला यांनी एक ट्वीट केले होते, यूकेमध्ये आपल्या भागीदारांशी त्यांची एक बैठक झाली आहे. यासह पुण्यातील लसीचे उत्पादन वेगाने सुरू असल्याचेही त्यांनी सांगितले होते

- Advertisement -