घरCORONA UPDATECorona Vaccine : दिलासा! ब्राझीलमध्ये तिसऱ्या टप्प्यातील लसीची चाचणी यशस्वी

Corona Vaccine : दिलासा! ब्राझीलमध्ये तिसऱ्या टप्प्यातील लसीची चाचणी यशस्वी

Subscribe

जगभरात कोरोनाचा संसर्ग झपाट्याने वाढत आहे. अशात जागतिक आरोग्य संघटनादेखील कोरोना लसीबाबत ठामपणे सांगताना दिसत नाहीत. अशात नागरिकांमध्ये कोरोनाची लस कधी येणार याबाबत उत्सुकता आहे. दरम्यान, दहा देशांमध्ये कोरोना लसीवर विविध प्रकारे चाचण्या केल्या जात आहे. यासंबंधी ब्राझीलमधून एक दिलासादायक माहिती समोर येत आहे. चीनच्या सिनोवॅक बायोटेकने विकसित केलेल्या कोरोनावरील लशीची ब्राझीलमध्ये तिसऱ्या टप्प्यातील चाचणी सुरू आहे. काल, सोमवारी या लसीचे प्रााथमिक परिणाम आणि निष्कर्ष जाहीर करण्यात आले असून ही लस सुरक्षित असल्याचे सांगण्यात आले आहे.

दोन डोसची लस आतापर्यंत सुरक्षित

याबाबत ब्यूटनेटन इन्स्टिट्यूटचे महासंचालक डिमास कोवास यांनी माहिती देसाना सांगितले की, कोरोनावॅक लशीची चाचणी संपूर्ण १३ हजार स्वयंसेवकांवर केली जात नाही. तोपर्यंत लस प्रभावी असल्यासंबंधीचा डेटा जाहीर करता येणार नाही. तसेच ही लस दिल्यानंतर कोणतेही गंभीर परिणाम समोर आले नाहीत. या चाचणीत सहभागी झालेल्यांपैकी २० टक्के स्वयंसेवकांनी इंजेक्शन टोचताना झालेल्या हलक्या वेदनेची तक्रार केली. तर, पहिला डोस घेतल्यानंतर १५ टक्के जणांनी डोके दुखीचा त्रास जाणवत असल्याची तक्रार केली आणि दुसऱ्या डोसनंतर फक्त १० टक्के जणांनी ही तक्रार केली. त्याशिवाय पाच टक्क्यांहून कमी स्वयंसेवकांनी थकवा जाणवत आहे. त्याहीपेक्षा कमी स्वयंसेवकांनी मांसपेशी दुखत असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

- Advertisement -

ब्राझीलमधील प्रमुख बायोमेडिकल रिसर्च सेंटरपैकी एक असलेल्या साओ पाउलोमधील ब्यूटेनटन इन्स्टिट्यूटमध्ये लस चाचणी करण्यात येत आहे. कोरोनावॅक ही दोन डोसची लस आतापर्यंत सुरक्षित आढळली असल्याचे इन्स्टिट्यूटने म्हटले आहे. या चाचणीत ९ हजार स्वयंसेवक सहभागी झाले होते.

हेही वाचा –

हाथसर प्रकरणातील आरोपी अल्पवयीन; CBI चौकशीत माहिती उघड

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -