घरताज्या घडामोडीCorona Vaccine: रशियानंतर चीननं शोधली लस, आपत्कालीन स्थितीत लसीला मंजुरी

Corona Vaccine: रशियानंतर चीननं शोधली लस, आपत्कालीन स्थितीत लसीला मंजुरी

Subscribe

रशियाकडून कोरोनावरील यशस्वी लस जाहीर झाल्यानंतर आता इतर देशांकडूनही लस तयार करण्याचे प्रयत्न सुरु आहेत. त्यातच आता चीन देशांनी देखील रशिया पाठोपाठ नंबर लावला आहे. काही निवडक कंपन्यांनी मिळून तयार केलेल्या दोन लसींना आपत्कालीन परिस्थितीत लस वापरण्यास चीनने मंजुरी दिली आहे. ज्या व्यक्तीला लस दिली आहे. त्या व्यक्तीला कोरोनाच्या संक्रमणाचा धोका अनिश्चित काळासाठी सर्वाधिक असू शकतो, अशी माहिती आरोग्य अधिकाऱ्यांनी दिली आहे.

चीनच्या कोरोना व्हायरस लसीकरण विकास टास्क फोर्सचे प्रमुख झेंग झोंगवेई यांनी शनिवारी सरकारी सीसीटीव्हीला दिलेल्या माहितीनुसार; वैद्यकीय नियम पाळून ही लस दिली जाणार आहे. तसेच ही लस दिल्यानंतर रुग्णाच्या निरीक्षणाची नोंद केली जाणार आहे. त्याचप्रमाणे या लसीचे होणारे दुष्परिणाम लक्षात घेऊन त्याचे पॅकेज तयार केले जाणार आहे. त्यामुळे आपत्कालीन स्थितीत ही लस दिल्यानंतर योग्य पद्धतीने लसीकरण केल्यापर्यंत इतर सुविधाही पोहोचवण्याची व्यवस्था केली जाणार आहे.

- Advertisement -

वैद्यकीय चाचणीची परवानगी

चीनमधील दोन्ही लसींना वैद्यकीय चाचणीची परवानगी मिळाली नसतानाही केवळ आपत्कालीन स्थितीत वापरण्याची परवानगी देण्यात आली आहे. चीनमध्ये एका लसीची सध्या मानवी चाचणी सुरू आहे. ही चाचणी यशस्वीपणे सुरू असल्याचा दावा चीनने केला आहे. २२ जुलैपासून ही चाचणी सुरू असून अद्याप एकालाही ताप आल्याचा दावा केला नाही.


हेही वाचा – Kim Jong-Un कोमात? बहिण सांभाळणार खुर्ची


- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -