Wednesday, May 12, 2021
27 C
Mumbai
घर CORONA UPDATE Corona Vaccine: अजित डोभाल यांचा एक फोन, अन् लस उत्पादनाचा कच्चा माल...

Corona Vaccine: अजित डोभाल यांचा एक फोन, अन् लस उत्पादनाचा कच्चा माल देण्यास अमेरिका तयार

देशातील कोरोना संकटात मदतीसाठी भारताचे एनएसए अजित डोभाल यांनी अमेरिकेचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार जेक सुलिवान यांच्यात चर्चा झाली.

Related Story

- Advertisement -

देशात कोरोनाची परिस्थिती दिवसेंदिवस गंभीर होत जात आहे. अशा परिस्थितीत देशात लसीचा तुटवडा निर्माण होत आहे. भारतात कोव्हिशिल्ड लस प्रभावी ठरत असल्याचे समोर आले आहे. मात्र त्यासाठी लागणाऱ्या कच्च्या मालावर अमेरिकेने बंदी घातली होती. सीरम इंस्टिट्यूटने ही बंदी हटवण्यासाठी अनेकदा विनंती केली होती. मात्र अमेरिकेने त्यावर काहीच उत्तर दिले नाही. मात्र भारताचे एनएसए अजित डोभाल यांच्या एका फोनवर अमेरिका लसीसाठी लागणारा कच्चा माल देण्यासाठी तयार झाली आहे. देशातील कोरोना संकटात मदतीसाठी भारताचे एनएसए अजित डोभाल यांनी अमेरिकेचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार जेक सुलिवान यांच्यात चर्चा झाली. या चर्चेत भारताच्या कोरोना परिस्थितीवर चर्चा करण्यात आली.

भारतात लसीसोबतच तयार झालेला ऑक्सिजनचा पुरवठा तुटवडा दुर करण्यासाठी अमेरिका भारताला मदत करण्याचा विचार करत आहे. त्याचबरोबर अमेरिका भारताला लागणाऱ्या पीपीई किट, व्हेंटिलेटर यांसारख्या महत्त्वाच्या वस्तूही पुरवत आहे. भारतात २०२२ पर्यंत भारतीय लस उत्पादक क्षमता वर्षांला १ अब्ज लसीचे डोस वाढविण्यासाठी अमेरिकेच्या डेव्हलपमेंट फायनान्स कॉर्पोरेशनकडूनही भारताला आर्थिक सहाय्य देण्याचा निर्णय अमेरिकेला घेतला आहे.

- Advertisement -

भारताला मदत करण्यासाठी अमेरिकेचे सीडीसी आपल्या विशेष तज्ज्ञांची टीम तयार करणार आहेत. ही टीम अमेरिकी दुतावास, भारतीय स्वास्थ मंत्रालय आणि भारताच्या एपिडेमोलॉजिकल इंटेलिजेंस स्टाफ सोबत काम करणार आहे. अमेरिकेने लसीच्या कच्च्यामालावरची बंदी हटवल्यामुळे भारताला आता मोठा दिलासा मिळाला आहे. भारतात लस तयार करण्यासाठी आता कोणता अडथळा येणार नाही अपेक्षा व्यक्त केली जात आहे.


हेही वाचा – Oxygen Shortage: वैद्यकीय क्षेत्रासाठीच ऑक्सिजनचा वापर करण्याचा गृहमंत्रालयाने दिला आदेश

- Advertisement -

 

- Advertisement -