घरदेश-विदेशCorona vaccine : कोरोनाविरोधी लसीवर रामदेव बाबांचे मोठे विधान, म्हणतायंत मी लवकरंच...

Corona vaccine : कोरोनाविरोधी लसीवर रामदेव बाबांचे मोठे विधान, म्हणतायंत मी लवकरंच लस घेणार

Subscribe

देशात कोरोना संसर्ग सुरु असतानाच अ‍ॅलोपॅथी उपचारापद्धतीवर केलेल्या वादग्रस्त वक्तव्यांमुळे योगगुरु रामदेव बाबा चांगलेच वादात सापडले होते. यातच बाबा रामदेवांनी कोरोनाविरोधी लसीवरही आत एक मोठे विधान केले आहे. २१ जूनपासून देशात १८ वर्षावरील सर्वांना मोफत लस मिळणार असल्याची घोषणा पंतप्रधान मोदींनी केली. या घोषणेचे कौतुक करत बाबा रामदेवांनी मी देखील लस घेणार असल्याचे विधान केले आहे. यावर बोलताना बाबा रामदेव म्हणाले की, ‘लवकरात लवकर मी लस घेणार आहे. तुम्हीही लस घ्या. आपल्या जीवनात योग आणि आयुर्वेदचा अभ्यास करा. आजारांच्या विरोधात योग ढाल म्हणून काम करते अन् कोरोनापासून होणाऱ्या त्रासापासून वाचवतो. मात्र बिकट आरोग्याच्या परिस्थितीत अॅलोपॉथी ही सर्वश्रेष्ठ उपचार पद्धती आहे. तसेच माझा कुठल्य़ाही आरोग्य संघटनला किंवा उपचारपद्धतीला विरोध नाही. माझी लढाई फक्त औषधं माफियांविरोधात आहे. असेही त्यांनी स्पष्ट केले.

‘डॉक्टर हे पृथ्वीवरील देवदूताप्रमाणे’

डॉक्टरांवर केलेल्या वादग्रस्त विधानातून युटर्न घेत डॉक्टर हे पृथ्वीवरील देवदूताप्रमाणे आहेत. असे बाबा रामदेव म्हणाले. यावेळी बाबा रामदेवांनी पंतप्रधान जनऔषधी केंद्राचे कौतुक केले. तसेच केंद्राच्या निर्णयामुळे नागरिकांना कमी खर्चात जेनेरिक औषधे सहजपणे मिळतील असेही ते म्हणाले.

- Advertisement -

वक्तव्यावरुन युटर्न घेत अॅलोपॅथीवर कौतुकाचा वर्षाव केला

गेल्या काही दिवसांपासून आयएमए आणि बाबा रामदेव यांच्यामध्ये अॅलोपॅथी औषधोत्पाचार पद्धतीवरून विवाद विवाद सुरु आहेत. अ‍ॅलोपॅथी हा प्रकार म्हणजे मुर्खपणा आहे आणि तो दिवाळे काढणारा आहे, असं बाबा रामदेव म्हणाले होते. तसेच डॉक्टरांविरोधातही अनेक वादग्रस्त विधाने केली होती. या एकूणचं वक्तव्यानंतर डॉक्टरांनी बाबा रामदेवांविरोधात तीव्र रोष व्यक्त केला. यानंतर बाबा रामदेवांनी आपल्या वक्तव्यावर खेद व्यक्त करत केला आणि आता त्यांनी आपल्या वक्तव्यावरुन युटर्न घेत अॅलोपॅथीवर कौतुकाचा वर्षाव केला आहे.


child labour: जगभरात २० वर्षानंतर पहिल्यांदाच बाल कामगारांच्या संख्येत वाढ, आफ्रिकेत सर्वाधिक संख्या


 

- Advertisement -

 

sushma rane
sushma ranehttps://www.mymahanagar.com/author/sushma-rane/
गेली ४ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -