Corona variant : ओमिक्रॉननंतरचा नवा व्हेरिएंट ठरणार प्राणघातक ; तज्ज्ञांचा दावा

केंब्रिज इन्स्टिट्यूट फॉर थेरप्यूटिक इम्युनोलॉजी अँड इन्फेक्शियस डिसीजेस (CITIID) मधील क्लिनिकल मायक्रोबायोलॉजीचे प्राध्यापक रवींद्र गुप्ता म्हणाले की, ओमिक्रॉनची व्हायरसची कमी गंभीरता एक चांगली गोष्ट आहे,म्हणजेच प्रत्यक्षात व्हायरसच्या रचनात्मक बदलांमध्ये ही एक उत्क्रांतीतील चूक आहे.

What happens if both Corona and Influenza infections occur at the same time? Read the answer to 'WHO'

जगभरात कोरोनाचे थैमान सुरु आहे. त्यात कोरोनाच्या पार्श्वभूमीवर करण्यात आलेले कडक निर्बंध शिथिल करताच आता पुन्हा एकदा कोरोनाचा नवा व्हेरिएंट डोके वर काढत आहे. दरम्यान, भारतीय वंशाच्या एका ब्रिटीश तज्ज्ञांनी इशारा दिला आहे की, कोरोनाचा नवा व्हेरिएंट प्राणघातक ठरणार आहे. केंब्रिज इन्स्टिट्यूट फॉर थेरप्यूटिक इम्युनोलॉजी अँड इन्फेक्शियस डिसीजेस (CITIID) मधील क्लिनिकल मायक्रोबायोलॉजीचे प्राध्यापक रवींद्र गुप्ता म्हणाले की, ओमिक्रॉनची व्हायरसची कमी गंभीरता एक चांगली गोष्ट आहे, म्हणजेच प्रत्यक्षात व्हायरसच्या रचनात्मक बदलांमध्ये ही एक उत्क्रांतीतील चूक आहे.

जेव्हा व्हायरसमधील ही चूक नैसर्गिकरित्या सुधारेल,तेव्हा कोरोनाचा नवा व्हेरिएंट हा यापेक्षाही भयानक असू शकतो.गुप्ता यांनी ओमिक्रॉनवरील अभ्यासानंतर सांगितले की, खरंतर,ओमिक्रॉन ज्या पेशींना संसर्ग करत आहे त्या फुफ्फुसांमध्ये फारच कमी प्रमाणात आहेत. त्यामुळे त्याचे परिणाम तितकेसे गंभीर दिसत नाही, परंतु प्रत्यक्षात त्याचे संक्रमण कोणत्याही बाबतीत सौम्य नाही.

प्रो. गुप्ता म्हणतात की सामान्यतः असे मानले जाते की, व्हायरस हे कालांतराने सौम्य होतात, परंतु हे दीर्घकालीन उत्क्रांतीचे परिणाम आहेत. हा टप्पा कोविडच्या बाबतीत आलेला नाही. तो वेगाने पसरत आहे. विषाणूचा जैविक वर्तन बदलत नसते. मात्र चुकून असे झाले आहे की, या व्हायरसने ज्या पेशींवर हल्ला केला आहे ज्या पेशी या फुफ्फुसात फारच कमी प्रमाणात आहेत. या क्षणी या व्हेरिंएंटचे परिणाम फारसे दिसून येणार नाहीत.मात्र कोरोनाचा नवा व्हेरिएंट हा अतिशय गंभीर स्वरुपाचा असू शकतो.या व्हेरिएंटची लक्षणे सौम्य दिसत असतील तरीही यावर उपाय करणे सोडू नये. या व्हेरिएंटपासून वाचण्यासाठी लसीकरण झाले पाहिजे.


हेही वाचा – Lockdown : लॉकडाऊनच्या भीतीने परप्रांतीय मजूरांनी धरली घरची वाट? रेल्वे स्थानकांवर गर्दी