घरताज्या घडामोडीकोरोना महामारीत Vermont जगातील सर्वात सुरक्षित राज्य, जाणून घ्या यामागचे कारण

कोरोना महामारीत Vermont जगातील सर्वात सुरक्षित राज्य, जाणून घ्या यामागचे कारण

Subscribe

जगभरात अजूनही कोरोना व्हायरसचा कहर सुरू आहे. अनेक देशांमध्ये कोरोनाच्या नव्या व्हेरियंटचा फैलाव झाल्यामुळे निर्बंध शिथिल केले नाही आहेत. सध्या कोरोनाचा डेल्टा आणि डेल्टा प्लस व्हेरियंटमुळे जगाची चिंता वाढली आहे. पण कोरोना महामारीत अमेरिकेतील व्हरमाँट ( Vermont) राज्य जगातील सर्वात सुरक्षित ठिकाण असल्याचे म्हटले जात आहे. न्यू इंग्लंड भागातील हे राज्य बर्नी सेंडर्स, मॅपल सीरप आणि बेन अँड जेरी आईस्क्रिमसाठी लोकप्रिय आहे. परंतु आता या राज्याने कोरोना महामारीत जगातील सर्वात सुरक्षित ठिकाण व्हरमाँट असल्याची घोषणा केली आहे. कारण अमेरिकेतील सर्वाधिक लसीकरण करणारे हे राज्य बनले आहे. अमेरिकेतील सर्वाधिक लोकसंख्या असलेल्या या दुसऱ्या क्रमांकावरील राज्यामध्ये लस घेणाऱ्या वयोगटातील ८० टक्के लोकांचे लसीकरण पार पडले आहे. इथल्या लोकांमध्ये समुदाय सहकार्याची भावना अधिक आहे.

आरोग्य आयुक्त मार्क लेव्हिन (Mark Levine) म्हणाले की, ‘या राज्यात झालेल्या लसीकरणाने अमेरिकेतील सर्वात सुरक्षित राज्य बनवले आहे. तसेच कदाचित हे ठिकाण जगातील सर्वात सुरक्षित राज्य आहे. मार्क अमेरिकन महामारीचे सल्लागार Anthony Fauci यांच्या टीममध्ये कार्यरत आहेत. अहवालात असे म्हटले आहे की, उत्तर-पूर्व ग्रामीण भागातील या राज्यामध्ये १२ वर्षांवरील ८२ टक्के लोकांनी कमीत कमी लसीचा एक डोस घेतला आहे. तर अमेरिकेत ६४ टक्के लोकांनी कमीत कमी एक लसीचा डोस आतापर्यंत घेतला आहे. म्हणजेच अमेरिकन सरासरीपेक्षा जास्त लोकांनी व्हरमाँटमध्ये लस घेतली आहे.

- Advertisement -

लसीबाबत सर्वात वाईट परिस्थितीत असलेले राज्य म्हणजे मिसिसिपी. या राज्याच्या तुलनेत व्हरमाँटमध्ये दुप्पट लोकांना लस दिली गेली आहे. यासाठी स्थानिक अधिकाऱ्यांना याचे क्रेडिट दिले गेले आहे. त्याच्या प्रयत्नांमुळे व्हरमाँटमधील जागोजागी लसीकरण केंद्र खोलले आहे. लोकांमध्ये लसीकरण आपली जबाबदारी असल्याची भावना निर्माण झाली आहे. आरोग्य विभागाचे लेक चँपलेन यांनी सांगितले की, ‘व्हरमाँटचे लोकं आरोग्याल जास्त महत्त्व देतात. लसीकरण मोहिमेच्या सुरुवातीसाठी ही सर्वात महत्त्वपूर्ण गोष्ट होती. लसीकरणाच्या बाबतीत व्हरमाँटचे लोकं अधिक सहकारी आणि आज्ञाधारक आहेत.’


हेही वाचा – Corona Third Wave: कोरोनाची तिसरी लाट ‘या’ महिन्यात शिगेला पोहोचणार; देशातील वैज्ञानिकांचा अंदाज

- Advertisement -

 

Priyanka Shinde
Priyanka Shindehttps://www.mymahanagar.com/author/spriyanka/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रिय. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव. सोशल मीडियावर काम करण्याची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -