घरताज्या घडामोडीकरोनापासून बचाव व्हावा म्हणून प्यायले दारु अन्...

करोनापासून बचाव व्हावा म्हणून प्यायले दारु अन्…

Subscribe

विषारी मद्याचे सेवन केल्याने २७० जणांना रुग्णालयात दाखल केले आहे. त्यांच्यावर उपचार सुरु असल्याची माहिती रुग्णालयाचे प्रवक्ते डॉ. अली इशनपौर यांनी दिली आहे.

जगभरात करोनाचा प्रादुर्भाव वाढत असताना करोना संदर्भात काही अफवादेखील पसरवण्यात आल्या आहेत. काही दिवसांपासून, दारु प्राशन केल्याने करोनापासून बचाव होतो, अशी अफवा पसरवण्यात आली होती. हा उपाय करुन ४४ जणांनी आपला जीव गमावला आहे. इराणमध्येही घटना घडली आहे.

मद्यसेवन केल्याने करोना विषाणुची लागण होत नाही, अशी अफवा पसरवण्यात आली होती. त्यानंतर या उपायाचा उपयोग करत ४४ लोकांनी विषारी मद्याचे सेवन करत आपला जीव गमावला आहे. दरम्यान, विषारी मद्याचे सेवन केल्याने २७० जणांना रुग्णालयात दाखल केले आहे. त्यांच्यावर उपचार सुरु असल्याची माहिती रुग्णालयाचे प्रवक्ते डॉ. अली इशनपौर यांनी दिली आहे. विषारी मद्याची विक्री केल्याप्रकरणी काही जणांना पालिसांनी अटक केली आहे.

- Advertisement -

हेही वाचा – करोना संशयिताचा भारतातला पहिला मृत्यू

करोनाने जागतिक स्तरावर ४००० हून अधिक लोक मरण पावले आहेत आणि ११३,०००हून अधिक संसर्गित झाले आहेत. करोनाने इराणमध्ये २९१ जणांचा मृत्यू झाला आहे. दरम्यान, भारताने इराणी नागरिकांना दिलेला व्हिजा रद्द करण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे इराणी नागरिक आणि १ फेब्रुवारीनंतर इराणचा दौरा करणाऱ्या नागरिकांचा व्हिजा आणि ई-व्हिजा रद्द केला आहे.


हेही वाचा – ज्योतिरादित्य आज भाजपमध्ये प्रवेश करणार

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -