घरताज्या घडामोडीकोरोनाची 'कॉलर ट्यून' बंद करा; आमदाराचे केंद्रीय मंत्र्यांना पत्र

कोरोनाची ‘कॉलर ट्यून’ बंद करा; आमदाराचे केंद्रीय मंत्र्यांना पत्र

Subscribe

सरकारने ज्या उद्देशाने कॉलर ट्यून सुरु केली होती तो साध्य झाला आहे. आता ही कॉलर ट्यून ऐकून कानबधिर होत आहेत. त्यामुळे तात्काळ बंद करावी, अशी मागणी आमदारांनी केली आहे.

जगभर पसरणाऱ्या कोरोना व्हायरसने भारतात देखील प्रवेश केला. त्यानंतर या कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने जनजागृतीसाठी सर्वच मोबाईल कंपन्यांना फोन कॉलपूर्वी कोरोनाबाबत माहिती देणारी कॉलर ट्यून वाजवण्याची सक्ती केली होती. त्यानंतर सर्वच कंपन्यांनी कॉल केल्यास सुरुवातीचे १५ ते २० सेकंद कोरोना कॉलर ट्यून लावण्यात आली. मात्र, या कॉलर ट्यूनमध्ये सुरुवातीचे १५ ते २० सेकंद जातात. त्यामुळे आता या कॉलर ट्यूनने कान बधिर झाले असून याविरोधात राजस्थानमधील कॉंग्रेस आमदार भरत सिंह यांनी आवाज उठवला आहे. ही कॉलर ट्यून बंद करण्याची मागणी केली आहे.

सांगोट विधानसभा मतदारसंघाचे आमदार भरत सिंह यांनी कोरोना जनजागृतीसाठी ऐकवल्या जाणाऱ्या कोरोना कॉलर ट्यूनवर आक्षेप घेतला आहे. आमदारांनी थेट केंद्रीय माहिती व प्रसारण मंत्री प्रकाश जावडेकर यांनी पत्र लिहिले आहे. यात त्यांनी आता चार महिने उलटून गेले असून सर्वांना याबाबत माहिती मिळाली आहे. त्यामुळे आता ही कॉलर ट्यून बंद करावी अशी मागणी केली आहे.

- Advertisement -

‘कोरोना विषाणूबाबत जनजागृती संदेश सर्वांपर्यंत पोहोचला आहे. सरकारने ज्या उद्देशाने कॉलर ट्यून सुरु केली होती तो साध्य झाला आहे. आता ही कॉलर ट्यून ऐकून कानबधिर होत आहेत. तसेच वेळही वाया जात आहे. त्यामुळे ही तात्काळ बंद करावी’,असे पत्र भगत सिंह यांनी केंद्रीय मंत्र्यांना धाडले.


हेही वाचा – Coronavirus Update: आज राज्यात ५,४९३ कोरोना रुग्णांची नोंद; तर १५६ जणांचा मृत्यू


- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -