घरताज्या घडामोडीCorona Virus: चीनमध्ये कोरोनाची नवी भयंकर लाट, शियियान शहरात १.३ करोड लोकांना...

Corona Virus: चीनमध्ये कोरोनाची नवी भयंकर लाट, शियियान शहरात १.३ करोड लोकांना घरीच राहण्याचे आदेश

Subscribe

जगभरात कोरोनाच्या नव्या ओमिक्रॉन व्हेरिएंटने धुमाकूळ घातला असताना चीनमधील शियियान शहरात कोरोनाच्या नव्या लाटेमुळे दीड कोटी लोकांना घरीच राहण्याचे आदेश दिले आहेत. चीनमध्ये कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे नागरिकांमध्ये भितीचे वातावरण पसरले आहे. दक्षिण आफ्रिकेत ओमिक्रॉन व्हेरिएंटचा रुग्ण सापडल्यानंतर काही दिवसांमध्ये जगातील अनेक देशांमध्ये याचा संसर्ग पसरला आहे. कोरोना ठराविक कालावधीनंतर आपले रुप बदलत असल्यामुळे सर्वच देशांमध्ये पुन्हा कडक निर्बंध लागू करण्यात आले आहेत.

चीनमध्ये शियियान प्रांतात १.३ करोड लोकांवर कडक निर्बंध लादण्यात आले आहेत. या नागरिकांना घरातून अत्यावश्यक कामाशिवाय बाहेर निघण्यावर बंदी घालण्यात आली आहे. कडक लॉकडाऊन लावण्यात आला आहे. नियमावलीनुसार फक्त अत्यावश्यक सामान आणि महत्वाच्या गोष्टी घेण्यासाठी घरातून बाहेर पडता येणार आहे. प्रत्येक घरातील एक किंवा दोन व्यक्तींनाच थोडा वेळासाठी बाहेर जाण्याची परवानगी दिली आहे. तर इतर सदस्यांना घरातच राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

- Advertisement -

शियियान प्रांतात बुधवारी कोरोनाचे नवे ५२ प्रकरणे समोर आली आहे. तर ९ डिसेंबरनंतर एकूण १४३ रुग्णांची वाढ झाली आहे. कोरोना रुग्णांचा आकडा वाढत असल्यामुळे सरकारकडून सांगण्यात आले आहे की, कोणत्याही महत्त्वाच्या कामाशिवाय नागरिकांनी शहर सोडून जाऊ नये, जर अत्यावश्यक काम असेल तर सरकारला त्याची माहिती द्यावी लागेल तसेच परवानगी मागण्यासाठी अर्ज करावा लागेल असे निर्बंध स्थानिक सरकारकडून लागू करण्यात आले आहेत.

ओमिक्रॉनच्या व्हेरिएंटमुळे जगात भीती

जगात ओमिक्रॉनच्या व्हेरिएंटमुळे नागरिकांमध्ये भिती पसरली आहे. कोरोनाच्या नव्या व्हेरिएंटच्या रुग्णांची संख्या वाढत असल्यामुळे सर्वच देशांमध्ये खबरदारी घेण्यात येत आहे. आंतरराष्ट्रीय प्रवाशांवरही निर्बंध लागू करण्यात आले आहेत. भारतातही ओमिक्रॉनच्या रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत असल्यामुळे निर्बंध कडक करण्यात येत आहेत. देशाची राजधानी दिल्लीमध्ये कोरोनाच्या नव्या ओमिक्रॉन व्हेरिएंटची संख्या वाढत चालली आहे.

- Advertisement -

हेही वाचा : आरोग्य विभाग परीक्षेची जबाबदारी न्यासाला का दिली?, राजेश टोपेंनी सांगितले कारण


 

Swapnil Jadhav
Swapnil Jadhavhttps://www.mymahanagar.com/author/jswapnil/
मागील तीन वर्षापासून डिजिटल मीडिया क्षेत्रात सक्रिय आहे. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. डिजिटल मीडियाचा अनुभव, वार्ताहर, अँकरिंगचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -