घरCORONA UPDATELockDown: पगाराची चिंता करू नका, 'या' हेल्पलाईनवर संपर्क करा

LockDown: पगाराची चिंता करू नका, ‘या’ हेल्पलाईनवर संपर्क करा

Subscribe

मजुरांच्या पगाराशी संबंधित समस्या सोडविण्यासाठी कामगार हेल्पलाइन सुरू केली आहे. त्यामुळे पगाराशी संबंधित काही अडचणी असल्यास कामगार हेल्पलाईनशी संपर्क साधू शकतात आणि तक्रार नोंदवू शकतात.

कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी देशात लॉकडाऊन करण्यात आले आहे. येत्या ३ मेपर्यंत लॉकडाऊन वाढवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मात्र, याचा फटका स्थलांतरित मजूरांना बसला आहे. जवळजवळ १ महिना मजुरांना काम नसल्यामुळे आपली नोकरी तर जाणार नाही ना? आपल्याला पगार मिळेल ना? असे एक ना अनेक प्रश्न स्थलांतरित मजुरांना पडले आहेत. मात्र, कामगार मंत्रालयाने स्थलांतरित मजुरांच्या पगाराशी संबंधित समस्या सोडविण्यासाठी कामगार हेल्पलाइन सुरू केली आहे. त्यामुळे पगाराशी संबंधित काही अडचणी असल्यास कामगार हेल्पलाईनशी संपर्क साधू शकतात आणि तक्रार नोंदवू शकतात. त्यामुळे मजुरांना मोठा दिलासा मिळाला आहे.

- Advertisement -

देशाच्या २० प्रादेशिक केंद्रांवर याची सुरूवात करण्यात आली असून या भागातील कामगार आपल्या जवळच्या प्रादेशिक केंद्राच्या हेल्पलाइन क्रमांकावर संपर्क साधू शकतात.

यामध्ये अहमदाबाद, अजमेर, आसनसोल, बेंगळूर, भुवनेश्वर, चंदीगड, चेन्नई, कोचीन, देहरादून, दिल्ली, धनबाद, गुवाहाटी, हैदराबाद, जबलपूर, कानपूर, कोलकाता, मुंबई, नागपूर, पटना आणि रायपूर यांचा समावेश आहे. या २० प्रादेशिक केंद्राच्या हेल्पलाइन क्रमांकावर संपर्क साधण्याची व्यवस्था करण्यात आली आहे.

- Advertisement -

त्याशिवाय प्रत्येक राज्याचा आणि केंद्रशासित प्रदेशाचा स्वतंत्र कोरोना व्हायरस हेल्पलाईन सुरु करण्यात आली आहे.

 

पगाराशी संबंधित काही अडचणी अल्यास कामगार हेल्पलाईनशी संपर्क साधून आपली तक्रार नोंदवू शकतात. कामगार विभाग त्यांच्या प्रश्नांवर त्वरित तोडगा काढेल. यासाठी संबंधित अधिकाऱ्यांचे फोन नंबरही देण्यात आले आहेत.


हेही वाचा – ‘आरोग्य सेतू’ ठरले १३ दिवसांत ५ कोटी लोकांनी डाऊनलोड केलेले जगातील पहिले App


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -