Corona Virus: राजनाथ सिंह यांच्यासह केंद्रातील बडे नेते कोरोना पॉझिटिव्ह, संपर्कात आलेल्यांना काळजी घेण्याचे आवाहन

Corona Virus defence minister rajnath singh jp nadda ajay bhatt corona positive in central government
Corona Virus: राजनाथ सिंह यांच्यासह केंद्रातील बडे नेते कोरोना पॉझिटिव्ह, संपर्कात आलेल्यांना काळजी घेण्याचे आवाहन

संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांना कोरोनाची लागण झाली आहे. तसेच संरक्षण राज्यमंत्री अजय भट्ट यांनाही कोरोनाची लागण झाली आहे. देशात कोरोनाबाधितांची संख्या वाढू लागली आहे. दिल्लीतही कोरोना रुग्णांची संख्या वाढू लागली आहे. सर्वोच्च न्यायालयात, संसदेत आणि केंद्रीय मंत्र्यांनाही कोरोनाची लागण झाली आहे. देशात कोरोना संसर्ग आणि ओमिक्रॉनच्या रुग्णांची संख्या वाढू लागली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील कोरोना परिस्थितीचा आढावा घेऊन नागरिकांना काळजी घेण्याचे आवाहन केलं आहे.

भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा यांनी कोरोना चाचणी केली होती. या कोरोना चाचणीचा अहवाल पॉझिटिव्ह आढळला आहे. तसेच संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी देखील कोरोनाची लागण झाली असल्याची माहिती दिली आहे. देशातील केंद्रीय मंत्र्यांना कोरोनाची लागण झाली असल्यामुळे चिंता व्यक्त करण्यात येत आहे. मोदी सरकारमध्येही अनेक खासदार आणि मंत्री कोरोनाबाधित झाले आहेत.

संरक्षण राज्यमंत्री अजय भट्ट यांनीही त्यांना कोरोनाची लागण झाली असल्याचे सांगितले आहे. भट्ट यांनी ट्विटरवर संसर्गाच्या सौम्य लक्षणांची माहिती शेअर केली आणि त्यांच्या संपर्कात आलेल्या लोकांना कोविड चाचणी घेण्याची विनंती केली. यानंतर भाजप अध्यक्ष जेपी नड्डा यांनीही कोविड पॉझिटिव्ह असल्याची माहिती दिली. बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार आणि कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनाही कोरोनाची लागण झाली आहे.

संरक्षण मंत्री राजनाथ सिंह म्हणाले की, ‘तपासात मला कोरोना विषाणूची लागण झाल्याचे आढळून आले आहे आणि माझ्यात सौम्य लक्षणे आहेत. मी घरी एकांतात आहे. अलीकडेच माझ्या संपर्कात आलेल्या प्रत्येकाला मी विनंती करतो की त्यांनी विलिगीकरणात रहावे आणि कोरोनापासून काळजी घ्यावी असे आवाहन राजनाथ सिंह यांनी केलं आहे. दरम्यान, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि भूपेंद्र यादव यांनी ट्विटरवर राजनाथ सिंह यांना लवकरात लवकर बरे व्हा असे म्हटलं आहे.

भाजप राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा यांनी ट्विट करून म्हटले लक्षणे आढळल्यामुळे माझी कोविड चाचणी केली. माझा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. मला आता निरोगी वाटत आहे. डॉक्टरांच्या सल्ल्याने मी स्वतःला वेगळं केलं आहे. गेल्या काही दिवसांत माझ्या संपर्कात आलेल्या सर्वांना विनंती आहे की त्यांनी स्वत:ची काळजी घ्यावी असे आवाहन जेपी नड्डा यांनी केलं आहे.


हेही वाचा : Punjab assembly elections 2022: अभिनेता सोनू सूदच्या बहिणीचा काँग्रेस प्रवेश, कोणत्या जागेवरून लढणार निवडणूक?