घरदेश-विदेशCorona च्या दुसऱ्या लाटेचा कहर; पुन्हा 'हे' तीन देश LockDwon च्या तयारीत!

Corona च्या दुसऱ्या लाटेचा कहर; पुन्हा ‘हे’ तीन देश LockDwon च्या तयारीत!

Subscribe

युरोपमध्ये गेल्या काही दिवसांत कोरोना बाधित रूग्णांची संख्या झपाट्याने वाढली आहे. परिस्थिती नियंत्रणात येण्यासारखी नसल्याने घेतला लॉकडाऊनचा निर्णय

जगात कोरोना विषाणूचे प्रमाण सातत्याने वाढत आहे. युरोपमध्ये गेल्या काही दिवसांत कोरोना बाधित रूग्णांची संख्या झपाट्याने वाढली आहे. परिस्थिती नियंत्रणात येण्यासारखी नसल्याने ब्रिटन, जर्मनी, फ्रान्ससह युरोपमधील अनेक देश पुन्हा लॉकडाऊनची घोषणा करण्याच्या तयारीत आहेत. जर्मनीने अगदी रेस्टॉरंट्स आणि बार पुन्हा एका महिन्यासाठी बंद करण्याचा आदेश जारी केला आहे.

जर्मन चांसलर अँजेला मर्केल यांनी हे निर्बंध अधिक कठोर करण्यासाठी जर्मनीच्या उच्च अधिकाऱ्यांशी चर्चा केली आहे. त्याचबरोबर फ्रान्समध्ये दिवसाला ५० हजाराहून अधिक रूग्णांची नोंद झाल्यानंतर अध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांनी देशाला संबोधित करताना कोरोनासंदर्भात नवीन नियम व निर्बंधासाठी तयार असल्याचे म्हटले आहे. डब्ल्यूएचओच्या आकडेवारीनुसार, गेल्या आठवड्यात युरोपात कोरोना बाधितांचे प्रमाण ३७ टक्के वाढले असून येथे १३ लाख नव्या रुग्णांची नोंद करण्यात आली आहेत. दरम्यान युरोपमधील कोरोनाच्या दुसर्‍या लाटेने कहर सुरू केला असल्याची चर्चा सुरू आहे.

- Advertisement -

ब्रिटनमध्ये काही भागात लॉकडाऊनची घोषणा

ब्रिटनमध्ये एका आठवड्यासाठी कोरोना विषाणूचे प्रमाण वाढले आहे. त्यानंतर कित्येक शहरांमध्ये लॉकडाऊन जाहीर करण्यात आला आहे. ब्रिटनच्या नॅशनल हेल्थ सर्व्हिसने वेल्स, ग्रेटर मँचेस्टर, लिव्हरपूल सिटी, लँकशायर, साऊथ यॉर्कशायर आणि स्कॉटलंड येथे लॉकडाऊनची घोषणा केली आहे.

युरोपमधील बर्‍याच देशांमध्ये दुसर्‍या कोरोना लाटेची शक्यता लक्षात घेता नवे निर्बंध लागू करण्यात आले आहेत. बेल्जियमने सर्व रेस्टॉरंट्स, बारवर नवीन निर्बंध लागू करण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे सोमवारपासून जवळपास एक महिना बंद ठेवण्याचे आदेश दिले आहेत, तर इटलीने लोकांना घराबाहेर पडायचे असेल तर मास्क वापरणे अनिवार्य असणार आहेत. तर संध्याकाळी सहा वाजल्यानंतर येथे बार आणि रेस्टॉरंट बंद राहतील असे आदेश देण्यात आले आहेत.


‘या’ देशात कोरोनाचा सर्वाधिक धोका; फैलाव रोखण्यासाठी पुन्हा लॉकडाऊनची घोषणा

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -