Tuesday, May 11, 2021
27 C
Mumbai
घर ताज्या घडामोडी Corona Virus: देशाचे माजी पंतप्रधान मनमोहन सिंह यांची कोरोनावर मात

Corona Virus: देशाचे माजी पंतप्रधान मनमोहन सिंह यांची कोरोनावर मात

केंद्र सरकारला पत्र लिहून दिला होता सल्ला

Related Story

- Advertisement -

देशाचे माजी पंतप्रधान मनमोहन सिंह यांनी कोरोनावर यशस्वी मात केली आहे. मनमोहन सिंह यांना कोरोनाची लक्षणे आढळल्याने त्यांची कोरोना चाचणी करण्यात आली होती. कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आल्याने १९ एप्रिल रोजी दिल्लीतील एम्स रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. परंतु मनमोहन सिंह यांनी कोरोनावर मात केली आहे. त्यांना आज २९ एप्रिल गुरुवारला एम्स रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. माजी पंतप्रधान मनमोहन सिंह यांची प्रकृती आता ठणठणीत असून त्यांना होम क्वारंटाईन राहण्याचा सल्ला डॉक्टरांनी दिला आहे. तसेच त्यांना घरीच विश्रांती घेत कोरोनावरील पुढील उपचार पद्धतीचे पालन करण्यास डॉक्टरांनी सांगितले आहे.

- Advertisement -

माजी पंतप्रधान मनमोहन सिंह यांनी कोव्हॅक्सीन कोरोना लसीचे दोन डोस घेतले आहेत. मनमोहन सिंह ८८ वर्षांचे असून त्यांना मधूमेह व इतर आजारही आहेत. तसेच त्यांची दोन वेळा बायपास शस्त्रक्रिया करण्यात आली आहे. कोरोना काळात मे २०२० मध्ये सौम्य ताप आला होता त्यामुळे त्यांना दिल्लीतील एम्स रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यावेळीही देशात कोरोनाचा हाहाकार होता.

केंद्र सरकारला पत्र लिहून दिला होता सल्ला

देशात कोरोनाच्या प्रादुर्भावाने हाहाकार घातला आहे. अशा परिस्थितीत कोरोनाशी लढण्यासाठी माजी मनमोहन सिंह यांनी केंद्र सरकारला पत्र लिहून काही सल्ले दिले होते. यामध्ये जर देशातील कोरोनाचा प्रादुर्भाव रोखायचा असेल तर देशात कोरोना लसीकरण आणि औषधांचा पुरवठा वाढवावा लागेल. लसीकरण करताना किती लोकांना लस दिले जात आहे. हे न पाहता कित्येक लोकांपर्यंत लसीकरण पोहचत आहे यावर भर दिला पाहिजे असा सल्ला माजी पंतप्रधान मनमोहन सिंह यांनी दिला आहे.

- Advertisement -