घरताज्या घडामोडीदिल्लीत कोरोनाचा शिरकाव, विमानतळावर आढळले दोन पॉझिटिव्ह रुग्ण

दिल्लीत कोरोनाचा शिरकाव, विमानतळावर आढळले दोन पॉझिटिव्ह रुग्ण

Subscribe

चीनमध्ये कोरोनाच्या नव्या व्हेरियंटने धुमाकूळ घातला आहे. कोरोनाचे हे रुप जगासाठी नवे नाहीये. मात्र, आतापर्यंत जगभरात या विषाणूमुळे ४७ हजारपेक्षा जास्त रुग्ण आढळले आहेत. चीननंतर आता भारतातही कोरोना विषाणूने शिरकाव केला आहे. दिल्ली विमानतळावर दोन पॉझिटिव्ह रुग्ण आढळले आहेत. विमान तळावर कोरोनाच्या चाचण्यांना सुरुवात करण्यात आली आहे. यामध्ये काल रविवारी करण्यात आलेल्या चाचणीत दोन रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह आढळले आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, आतापर्यंत ४५५ चाचण्या करण्यात आल्या आहेत. तर शनिवारी ११० आणि काल रविवारी ३४५ प्रवाशांचे नमुने घेण्यात आले आहेत. मात्र, त्यांचा अहवाल आज समोर आला असून काल एक व्यक्ती पॉझिटिव्ह आढळून आली होती. या व्यतिरिक्त कोलकाता विमानतळावर दोन प्रवाशांनाही कोरोनाची लागण झाल्याची माहिती समोर आली आहे. एक प्रवासी दुबईहून तर दुसरा प्रवासी मलेशियातील क्वालालंपूर येथून आला होता. दोघांचेही नमुने जीनोम सिक्वेन्सिंगसाठी पाठवण्यात आले आहेत.

- Advertisement -

मुंबई, हैदराबाद, बेंगळुरू, चेन्नई, अहमदाबाद, पुणे, इंदूर आणि गोवा या विमानतळांवर आंतरराष्ट्रीय प्रवाशांची कोरोना चाचणी सुरू करण्यात आली आहे. ज्यामध्ये प्रत्येक आंतरराष्ट्रीय फ्लाइटमध्ये येणाऱ्या प्रवाशांचे दोन नमुने घेतले जात आहेत. चीन, जपान, दक्षिण कोरिया, सिंगापूर आणि थायलंडमधील प्रवाशांसाठी आरटी-पीसीआर चाचणी अनिवार्य करण्यात येणार असल्याची माहिती केंद्रीय आरोग्य मंत्री मनसुख मांडविया यांनी दिली. तसेच या देशांमधून भारतात येणारे प्रवासी कोविड-१९ पॉझिटिव्ह आढळल्यास किंवा त्यांना ताप आल्यास त्यांना वेगळे ठेवण्यात येणार आहे.

२०२० मध्ये कोरोना महामारी सुरू झाल्यापासून आतापर्यंत दिल्लीत २० लाख ७ हजार १४३ रुग्ण आढळले आहेत. यासोबतच २६ हजार ५२१ रुग्णांच्या मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. नोव्हेंबरच्या मध्यापासून दररोज सापडणाऱ्या रुग्णांची संख्या २० च्या खाली घसरली आहे. त्याचप्रमाणे पॉझिटिव्हिटी रेट १ टक्क्यांपेक्षाही कमी आहे.

- Advertisement -

कोरोनानंतर २ वर्षांनी नागपूरमध्ये हिवाळी अधिवेशन भरले आहे. अधिवेशननिमित्ताने संपूर्ण मंत्रिमंडळ, सरकारी अधिकारी, महत्वाचे नेते नागपुरात आहेत. सोबतच विविध संस्था, संघटनांचे प्रतिनिधी आणि कार्यकर्तेही नागपुरात ठाण मांडून असल्याने विधिमंडळ परिसरात चांगलीच गर्दी होत आहे. सध्या जगभरात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्याने नागपूर प्रशासन सतर्क झाले आहे.


हेही वाचा : नागपूरमध्ये सरकारी कार्यालयात मास्क बंधनकारक; प्रशासनाचे


 

mayur sawant
mayur sawanthttps://www.mymahanagar.com/author/mayursawant/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रिय. राजकीय, क्रीडा विषयात लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -