Sunday, September 19, 2021
27 C
Mumbai
घर CORONA UPDATE लखनऊमध्ये सांडपाण्यात आढळला कोरोनाचा विषाणू,तीन ठिकाणांहून गोळा करण्यात आले होते नमुने

लखनऊमध्ये सांडपाण्यात आढळला कोरोनाचा विषाणू,तीन ठिकाणांहून गोळा करण्यात आले होते नमुने

पाण्यात सापडलेल्या कोरोना व्हायरसचे सर्व रिपोर्ट ICMR व WHO कडे सोपवण्यात आले

Related Story

- Advertisement -

उत्तर प्रदेश आणखी धोका निर्माण झाला आहे.  काही दिवसांपूर्वी गंगा नदीच्या विविध भागात मृतदेह आढळून आले होते. हे मृतदेह कोरोना रुग्णांचे असल्याचा अंदाज होता. त्यामुळे ICMR आणि WHO ने देशभरात पाण्यात कोरोना व्हायरसची चाचणी करण्यासाठी सांगितले होते. त्यासाठी देशात ८ सेंटर तयार करण्यात आले होते. या सेंटरमधील लखनऊच्या SGPGI रुग्णालयाचा समावेश करण्यात आला होता. पीजीआई मायक्रोबायोलॉजीच्या विभाध्यक्ष उज्जवला घोषाल यांनी सांगितल्यानुसार, पहिल्या टप्प्यात लखनऊच्या वेगवेगळ्या ठिकाणाहून सांडपाण्याचे नमुने गोळा करण्यात आले होते. त्यातील एका ठिकाणी पाण्यात कोरोना व्हायरस आढळून आला आहे. (Corona virus found in sewage water in Lucknow)

डॉ उज्ज्वला यांनी असे म्हटले आहे की, पाण्यात सापडलेल्या कोरोना व्हायरसचे सर्व रिपोर्ट ICMR कडे सोपवण्यात आले आहे. पाण्यात व्हायरस मिळण्याचे कारण सांडपाणी आहे. कोरोनाच्या काळात कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण होम आयसोलेशनमध्ये असताना वाहून आलेल्या सांडपाण्यात व्हायरसचे संक्रमण झाले आहे. अर्ध्याहून अधिक रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे त्यांच्या वाहून आलेल्या सांडपाण्यात कोरोना व्हायरस सापडला आहे. पाण्यात वाहून आलेल्या मृतदेहांमुळे पाण्यात व्हायरस मिळाल्याची कोणताही माहिती देण्यात आलेली नाही

- Advertisement -

SGPI ने सांडपाण्याचे नमुने लखनऊच्या खद्रा परिसरातील रुकपूर, दुसरे घंटाघर आणि मछली मोहाल या तीन ठिकाणांहून घेण्यात आले होते. या तीन ठिकाणी संपूर्ण परिसरातील सांडपाणी वाहून एका ठिकाणी येते. १९ मे रोजी सांडपाण्याचे नमुने गोळा करण्यात आले होते. सध्या ICMR आणि WHO कडे रिपोर्ट पाठवण्यात आले आहेत. हे अध्ययन प्राथमिक आहे. या विषयाचा भविष्यात सखोल अभ्यास केला जाणार आहे. पाण्यातून कोरोनाचा संसर्ग पसरतो की नाही हा संशोधनाचा विषय आहे. येणाऱ्या काळात अभ्यास आणि संशोधनाच्या आधारे पाण्यातून कोरोना व्हायरस पसरतो का हे सिद्ध होईल,असे डॉ. उज्ज्वला यांनी म्हटले आहे.


हेही वाचा – Corona Vaccination: उत्तर प्रदेशमधील गावातील लोकांनी लस देणार म्हणून घेतल्या नदीत उड्या

- Advertisement -