घरताज्या घडामोडीगुड न्यूज! जगभरातील करोनाग्रस्तांपैकी निम्मे रु्ग्ण झाले 'रिकव्हर'

गुड न्यूज! जगभरातील करोनाग्रस्तांपैकी निम्मे रु्ग्ण झाले ‘रिकव्हर’

Subscribe

जगभरात करोना व्हायरसची दहशत निर्माण झालेली असतानाच एक गुड न्यूज समोर आली आहे.  चीनमधील वुहान शहरानंतर ईराण, ईटलीसह १४० देशांमध्ये खळबळ उडवणाऱ्या करोनाची लागण झालेल्या रुग्णांपैकी निम्मे  रुग्ण करोनामुक्त झाले आहेत. ईराकमधील ‘शफाक’ या वृत्तसंकेतस्थळाने ही महत्वपू्र्ण माहिती दिली आहे. अमेरिकेतील ‘जॉन्स हॉपकिन्स युनिव्हर्सिटी’ या संशोधन संस्थेच्या डेटाचा हवाला देत ही बातमी देण्यात आली आहे. यामुळे करोनाच्या दहशतीखाली वावरणाऱ्या जगभरातील नागरिकांनी सुटकेचा निश्वास सोडला आहे.

या डेटानुसार जगभरात १५६,४०० लोकांना करोनाची लागण झाली. त्यापैकी ५,८३३ जणांचा मृत्यू झाला. डिसेंबर महिन्यात करोना चीनमधील वुहान शहरातून इतर देशात पसरला. पण आता जगभरातील ७३, ९६८ करोनाग्रस्त या आजारातून पू्र्णपणे बरे झाले आहेत. असे जॉन्स हॉपकिन्स युनिव्हर्सिटी या संशोधन संस्थेने आपल्या अहवालात म्हटले आहे. या अहवालातील आकडेवारीनुसार चीनमध्ये सर्वाधिक करोनाग्रस्त आहेत.

- Advertisement -

यात ८०, ९९५ जणांना करोनाची लागण झाली असून ३, २०३ जण यात दगावले आहेत. तर ईटलीमध्ये २१, १५७ करोनाग्रस्त असून यातील १,४४१ जणांचा मृत्यू झाला आहे. ईराणमध्ये अद्यापपर्यंत १२, ७२९ जणांना करोनाची लागण झाली आहे तर ६११ जणांचा मृत्यू झाला आहे. दक्षिण कोरियामध्ये ८, ०८६ जणांना करोनाची लागण झाली तर ७२ जण दगावले आहेत. स्पेनमध्ये ६, ३९१ करोनाग्रस्त आहेत. तर १९६ जणांचा मृत्यू झाला आहे. दरम्यान करोनाची लागण होणाऱ्या, मृत्यूमुखी पडणाऱ्या व बरे होणाऱ्यांच्या आकड्यात सातत्याने चढ उतार होत आहे. त्यामुळे संख्याही बदलत आहे.

जर्मनीत ४५८५ जणांना करोनाची लागण झाली आणि जणांचा मृत्यू झाला. जणांना करोनाची लागण झाली आणि जणांचा मृत्यू झाला. फ्रान्समध्ये ४, ४८१ करोनाग्रस्त आहेत तर ९१ जणांचा मृत्यू झाला आहे. अमेरिकेत २, ९५२ जणांना करोनाची लागण झाली आहे. तर ५७ जणांचा मृत्यू झाला आहे. स्विझरलँड मध्ये १, ३५९ जणांना करोनाची लागण झाली असून १३ जणांचा मृत्यू झाला. तर इंग्लडमध्ये ११४३ जणांना करोना लागण झाली आहे. तर २१ जण दगावले आहेत. अरब देशांत कतारमध्ये सर्वाधिक ३३७ करोना रुग्ण असून अद्याप येथे मृत्यूची नोंद नाही. रशियात ५९ लोकांना करोनाची लागण झाली असून एकाचाही मृत्यू झालेला नाही. असे या अहवालात नमूद करण्यात आले आहे. यामुळे करोनाच्या दहशतीखाली वावरणाऱ्या जगभरातील नागरिकांना दिलासा मिळाला आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -