घरदेश-विदेशCorona virus : 140 दिवसांत कोरोनाच्या संसर्गामध्ये सर्वाधिक वाढ, बुधवारी तिघांचा मृत्यू

Corona virus : 140 दिवसांत कोरोनाच्या संसर्गामध्ये सर्वाधिक वाढ, बुधवारी तिघांचा मृत्यू

Subscribe

नवी दिल्ली : देशात पुन्हा एकदा कोरोना संसर्गाच्या रुग्णांमध्ये झपाट्याने वाढ होत असून मागील 140 दिवसांत संसर्गाची विक्रमी प्रकरणे नोंदवली गेली आहेत. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या अहवालानुसार बुधवारी (२२ मार्च) 1300 लोकांना संसर्ग झाल्याचे आढळून आले आहे. त्यामुळे सक्रिय प्रकरणांची संख्या 7605 झाली आहे. या संसर्गामुळे बुधवारी तीन रुग्णांचा मृत्यू झाला आहे. मृत रुग्ण कर्नाटक, गुजरात आणि महाराष्ट्रातील आहेत. त्यामुळे देशात आतापर्यंत 5 लाख 30 हजार 816 लोकांचा संसर्गामुळे मृत्यू झाला आहे.

आश्चर्यकारक करणारे आकडे
1. कोरोना संसर्गाच्या रोजच्या आकडेवारीनुसार 1.46 वाढ, तर आठवड्याच्या आकडेवारीनुसार 1.08 टक्क्यांने वाढ होत आहे.
2. देशात आतापर्यंत 4 कोटी 46 लाख 99 हजार 418 लोकांचा संसर्गामुळे मृत्यू झाला आहे.
3. देशात ०.०२ टक्के रुग्ण उपचार घेत आहेत, तर ९८.७९ टक्के रुग्ण बरे झाले आहेत.
4. गेल्या 24 तासात 89,078 लोकांची चाचणी केली असून आतापर्यंत ९२.०६ कोटी लोकांची कोरोना चाचणी करण्यात आली आहे.
5. देशात आतापर्यंत कोरोना लसीचे 220.65 कोटी डोस देण्यात आल्याचे आरोग्य मंत्रालयाचे म्हणणे आहे.

- Advertisement -

परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी पंतप्रधान मोदींकडून बैठक
देशातील दिवसेंदिवस वाढणाऱ्या कोरोनाच्या प्रकरणांमुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बुधवारी महत्त्वाची बैठक बोलावली होती. यावेळी देशातील कोरोना परिस्थितीचा आढावा घेण्यात आला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बैठकीदरम्यान सध्याची कोरोना परिस्थिती आणि सार्वजनिक आरोग्य सज्जतेचा आढावा घेतला.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील कोविड-19 आणि इन्फ्लूएंझाच्या परिस्थितीचे मूल्यांकन करण्यासाठी एका उच्चस्तरीय बैठकीचे अध्यक्षस्थान केल्याचे पंतप्रधानांच्या कार्यालयाकडून सांगण्यात आले आहे. देशात इन्फ्लूएंझा प्रकरणांमध्ये झालेली वाढ आणि गेल्या दोन आठवड्यांमध्ये कोरोनाच्या प्रकरणांमध्ये झालेली वाढ लक्षात घेऊन ही बैठक बोलावण्यात आली होती.
बैठकीदरम्यान पंतप्रधानांनी अधिकाऱ्यांना नियुक्त केलेल्या INSACOG जीनोम सिक्वेन्सिंग प्रयोगशाळांसह सकारात्मक नमुन्यांची संपूर्ण जीनोम क्रमवारी वाढवण्याचे निर्देश दिले आहेत. यामुळे नवे व्हेरिएंट, जर मिळाल्यास त्याची ट्रॅकींग आणि त्यावर लवकर प्रतिक्रिया होण्यास मदत करेल.

हॉस्पिटलच्या आवारात मास्क घालण्यावर भर
रूग्ण, आरोग्य व्यावसायिक आणि आरोग्य कर्मचाऱ्यांना हॉस्पिटलच्या आवारात मास्क घालण्यावर पंतप्रधान कार्यालयाकडून भर दिला आहे. ज्येष्ठ नागरिक आणि अन्य विकार असलेल्या लोकांना गर्दीच्या ठिकाणी जाताना मास्क घालण्याचा सल्ला दिला पाहिजे.

- Advertisement -

कोविडबद्दल जागरूक राहण्याची गरज
पंतप्रधान कार्यालयाने अधोरेखित केले की, कोविड-19 साथीचा रोग अद्याप संपलेला नसून देशभरातील परिस्थितीवर नियमितपणे लक्ष ठेवले जात आहे. चाचणी, ट्रॅक, उपचार, लसीकरण आणि कोविड योग्य वर्तनाच्या 5 पट धोरणावर लक्ष केंद्रित करणे, सर्व गंभीर श्वसन आजार (SARI) प्रकरणांची प्रयोगशाळेतील देखरेख आणि चाचणी वाढविण्याचा सल्ला पंतप्रधानांनी दिला आहे. ते म्हणाले की, आमची रुग्णालये सर्व गरजांसाठी तयार आहेत याची खात्री करण्यासाठी नियमितपणे मॉक ड्रिल आयोजित केल्या पाहिजेत.
याआधी बुधवारी केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार भारतात 1134 नवीन कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. सध्या 7,026 कोरोना बाधितांवर उपचार सुरू आहेत. यादरम्यान पाच जणांचा मृत्यू झाला आहे. छत्तीसगड, दिल्ली, गुजरात आणि महाराष्ट्रात प्रत्येकी एकाचा मृत्यू झाला आहे. याशिवाय केरळमध्ये एका कोरोनाबाधित व्यक्तीला आपला जीव गमवावा लागला आहे. देशातील रोजच्या आकडेवारीमध्ये 1.09 टक्के नोंद, तर आठवड्याच्या आकडेवारीमध्ये 0.98 टक्के नोंद झाली आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -