घरCORONA UPDATEcoronavirus india : कोरोनाची त्सुनामी! देशात 7 महिन्यानंतर रुग्णसंख्या 1 लाखांच्या पुढे

coronavirus india : कोरोनाची त्सुनामी! देशात 7 महिन्यानंतर रुग्णसंख्या 1 लाखांच्या पुढे

Subscribe

भारतातील रिकव्हरी रेट 97.57 टक्के आहे. गेल्या 24 तासांत भारतात 30,836 रुग्ण बरे झाले आहेत. तर आतापर्यंत 3,43,71,845 रुग्ण कोरोनातून बरे झाले आहेत.

जगभरात कोरोनाच्या नव्या ओमिक्रॉन व्हेरिएंटमुळे दररोज रुग्णांची धडकी भरवणारी आकडेवारी समोर येत आहे. यामुळे भारतातही कोरोनाच्या तिसरी लाटेला सुरुवात झाली असे म्हटले जातेय. भारतात गेल्या 24 तासात कोरोनाचे 1,17,100 नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे गुरुवारच्या तुलनेत ही रुग्णसंख्या २८.८ टक्के अधिक आहे. बुधवारी देशात कोरोनाचे 90 हजारांहून अधिक नवे रुग्ण आढळले होते. त्यामुळे जवळपास 7 महिन्यांनंतर भारतात कोरोनाच्या नव्या रुग्णांची संख्या 1 लाख पार गेली आहे. यापूर्वी 6 जून 2021 रोजी भारतात एक लाखाच्या पुढे रुग्णसंख्या नोंदवण्यात आली होती.

24 तासांत 302 जणांचा मृत्यू

भारतात गेल्या 24 तासांत 302 जणांचा मृत्यू झाला आहे. आतापर्यंत 4.83 लाख लोकांचा मृत्यू झाला आहे. गेल्या 24 तासांत केरळमध्ये 221 लोकांचा मृत्यू झाला असून, मृत्यूची सर्वाधिक संख्या आहे. याशिवाय बंगालमध्ये ९ जणांचा मृत्यू झाला आहे.

- Advertisement -

भारतातील रिकव्हरी रेट 97.57 टक्के

भारतातील रिकव्हरी रेट 97.57 टक्के आहे. गेल्या 24 तासांत भारतात 30,836 रुग्ण बरे झाले आहेत. तर आतापर्यंत 3,43,71,845 रुग्ण कोरोनातून बरे झाले आहेत.

- Advertisement -

सक्रिय रुग्णांची संख्या 3.71 लाख

भारतात सक्रिय रुग्णांची संख्या 3.71 लाख झाली आहेत. गेल्या 24 तासात 85,962 सक्रिय रुग्णांची नोंद झाली आहे. तर देशात आतापर्यंत नागरिकांना 1,49,66,81,156 लसीचे डोस देण्यात आले आहेत. त्याच वेळी, गेल्या 24 तासात 94,47,056 डोस घेण्यात आले आहेत.

30.97 टक्के रुग्ण केवळ महाराष्ट्रात

देशात आतापर्यंत कोरोनाचे 3,52,26,386 रुग्ण आढळले आहेत. यात देशातील 5 राज्यांमध्ये कोरोनाचे सर्वाधिक रुग्ण आढळून आलेत. यातील महाराष्ट्रात 36265 रुग्ण, पश्चिम बंगालमध्ये 15421 रुग्ण, दिल्लीत 15097 रुग्ण, तामिळनाडूमध्ये 6983 रुग्ण, कर्नाटकात 5031 रुग्ण आढळून आले आहेत. भारतातील एकूण रुग्णांपैकी 67.29 टक्के नवे कोरोनाबाधित रुग्ण या 5 राज्यांमध्ये आहेत. तर एकूण रुग्णांपैकी 30.97 टक्के रुग्ण केवळ महाराष्ट्रात आढळून आले आहेत.

देशात ओमिक्रॉनचे 3000 रुग्ण 

देशात आतापर्यंत ओमिक्रॉनच्या 3007 रुग्णांची नोंदवली झाली आहे. मात्र, यातील 1199 रुग्ण बरेही झाले आहेत. यात महाराष्ट्रात 876, दिल्ली 465, कर्नाटक 333, राजस्थान 291, केरळ 284, गुजरात 204 मध्ये सर्वाधिक रुग्ण आढळले आहेत. त्याच वेळी, तामिळनाडूमध्ये 121, हरियाणामध्ये 114, तेलंगणात 107, ओडिशात 60, उत्तर प्रदेशमध्ये 31, आंध्र प्रदेशात 28, बंगालमध्ये 27, गोव्यात 19, आसाममध्ये 9, मध्य प्रदेशात 9, 8 उत्तराखंड मध्ये गेले आहेत.


Coronavirus : सुप्रीम कोर्टात कोरोनाचा शिरकाव, न्यायाधीश ही करणार ‘वर्क फ्रॉम होम’


sushma rane
sushma ranehttps://www.mymahanagar.com/author/sushma-rane/
गेली ४ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -