घरCORONA UPDATEजागतिक कोरोना अपडेट'या' देशात आहे भारतापेक्षा कमी कोरोना रूग्ण, पण मृत्यूची संख्या आहे...

‘या’ देशात आहे भारतापेक्षा कमी कोरोना रूग्ण, पण मृत्यूची संख्या आहे जास्त!

Subscribe

भारतात कोरोनाचा प्रसार थांबवण्यासाठी ४० दिवसांचा लॉकडाऊन जाहीर करण्यात आला होता.

भारतात कोरोना रूग्णांची संख्या ५६ हजारांच्या वर गेली आहे. पण समाधानकारक गोष्ट म्हणजे भारतात कोरोनाने मृत्यू झालेल्या लोकांची संख्या इतर देशांच्या तुलनेत कमी आहे. पण कोरोनामुळे त्रस्त आणखी चार देश असे आहेत. ज्या देशात भारताच्या तुलनेत कोरोना रूग्णांची संख्या कमी आहे. पण मृत्यूचे प्रमाण अधिक आहे.

भारतात कोरोनाचा प्रसार थांबवण्यासाठी ४० दिवसांचा लॉकडाऊन जाहीर करण्यात आला होता. ज्याच्यामुळे कोरोनावर नियंत्रण मिळवणं शक्य झालं आहे. मात्र तरीही दिवसेंदिवस कोरोनाच्या रूग्णांत वाढ होत आहे. शुक्रवारी रात्री ५६ हजार ३२४ रूग्णांची नोंद देसभरात करण्यात आली आहे. तर १,८८६ लोकांचा कोरोनामुळे मृत्यू झाल्याची नोंद करण्यात आली आहे.

- Advertisement -

पण जगात असे अनेक देश आहेत ज्या देशात भारतापेक्षा कोरोना रूग्णांची संख्या कमी आहे. पण मृत्यूचा आकडा जास्त आहे. बेल्जियममध्ये कोरोनाचे ५२ हजार ११ रूग्ण आहेत. पण देशात ८ हजार ५२१ लोकांचा मृत्यू झाला आहे.

या देशात होतायत सर्वाधिक मृत्यू

जॉन हॉपकिंस युनिव्हर्सिटीच्या रिपोर्टनुसार, बोल्जिअमच्या शेजारील राष्ट्र नेदरलॅण्डमध्येही अशीच काहीशी स्थिती आहे. नेदरलॅण्डमध्ये ४२ हाजर २९२ कोरोनाचे रूग्ण आहेत. तर ५ हजार ३७७ लोकांचा मृत्यू झाला आहे. तर दक्षीण अमेरिकेतील मॅक्सिकोमध्ये हालत जास्त वाईट आहे. मॅक्सिकोमध्ये २९ हजार ६१६ कोरोनाचे रूग्ण आहेत. तर २ हजार ९६१ नागरिकांचा मृत्यू झाला आहे.

- Advertisement -

हे ही वाचा – लॉकडाऊन किस्सा… दोन हार आणि लाडू बस्स…झालं की हो लग्न!


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -