घरCORONA UPDATEदेशातील पाच राज्यांच्या वटवाघळांमध्ये आढळला कोरोना विषाणू

देशातील पाच राज्यांच्या वटवाघळांमध्ये आढळला कोरोना विषाणू

Subscribe

पुण्यातील नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ व्हायरोलॉजी या संस्थेने केलेल्या संशोधनात हे आढळून आलं.

जगभरात थैमान घालणारा कोरोना विषाणू वटवाघळात आढळतो, असा अंदाज वर्तवला जात होता, परंतु भारतीय शास्त्रज्ञांनी केलेल्या अभ्यासात याची खात्री झाली आहे. देशातील १० पैकी पाच राज्यांत हा विषाणू वटवाघळात सापडला आहे. दोन जातींच्या वटवाघळांच्या अभ्यासानंतर हा खुलासा झाला. दोन्ही प्रजातींपैकी ५८६ पैकी २५ वटवाघूळ संक्रमित असल्याचं स्पष्ट झालं. दरम्यान, जगात जो कोरोना विषाणू पसरला, तो नाही आहे. पुण्यातील नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ व्हायरोलॉजीची (एनआयव्ही) प्रयोगशाळा तीन वर्षांपासून वटवाघळांवर संशोधन करत आहे. दरम्यान, वैज्ञानिकांनी कोरोना विषाणूंसह वटवाघळांच्या नमुन्यांचीही तपासणी सुरू केली. अनेक वटवाघळांच्या गळ्यातील आणि गुदाशयांच्या नमुन्यांची चाचणी केली असता कोरोना संक्रमित असल्याचं आढळले, असं इंडियन काउन्सिल ऑफ मेडिकल रिसर्चने (आयसीएमआर) सांगितलं आहे. यापैकी दोन जणांना आतड्यांमधे आणि मूत्रपिंडातही संसर्ग होता. केरळमध्ये आलेला निपाह विषाणूसुद्धा वटवाघळामधून आला होता. नवीन संक्रमण शोधण्यासाठी ज्या राज्यात वटवाघूळ जास्त आढळतात अशा ठिकाणी सतत पाळत ठेवणे आवश्यक आहे.

या राज्यांमधून घेतले नमुने

वटवाघळांच्या प्रजातीसाठी केरळ, चंदीगड, कर्नाटक, हिमाचल प्रदेश, पंजाब, गुजरात, ओडिशा, पुद्दुचेरी, तामिळनाडू आणि तेलंगणा येथून ५०८ नमुने घेण्यात आले. केरळ, कर्नाटक, चंदीगड, गुजरात, ओडिशा, पंजाब आणि तेलंगणा येथून दुसऱ्या प्रजातीच्या ७८ वटवाघळांचे नमुने गोळा केले गेले. यादरम्यान १२ जणांचा मृत्यू झाला.

- Advertisement -

संसर्ग माणसांपर्यंत कसा पोहोचला?

वैज्ञानिक डॉ. आर. बाला सुब्रह्मण्यम म्हणतात की केरळमधील वटवाघळांचा अभ्यासात समावेश होता. पुण्यात तपासणीनंतर त्यांच्यात कोरोना विषाणू असल्याची खात्री झाली. काही वर्षांपूर्वी निपाह विषाणू देखील वटवाघळामधून आला होता. अभ्यासात समाविष्ट असलेल्या काही वटवाघळांमध्ये कोरोना विषाणू सापडला आहे. तथापि ते मानवांमध्ये कसे पोहोचले? यावर सध्या सखोल अभ्यास आवश्यक आहे, असं पुण्यातील नॅशनल इंस्टिट्यूट ऑफ व्हायरोलॉजीच्या संचालक डॉ. प्रिया अब्राहम म्हणाल्या.

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -