घरCORONA UPDATECoronavirus: काश्मिरी तरुणांनी बनवलं स्वस्त व्हेंटिलेटर

Coronavirus: काश्मिरी तरुणांनी बनवलं स्वस्त व्हेंटिलेटर

Subscribe

तुडवडा लक्षात घेऊन बनवला व्हेंटीलेटर

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर देशात पीपीई किट, मास्क, सॅनिटायझर्स, व्हेंटिलेटर या गोष्टींचा मोठ्या प्रमाणात तुटवडा भासत आहे. हा तुटवडा कमी करण्यासाठी सरकार आणि काही संस्था दिवसरात्र काम करत आहेत. कोरोनाबाधितांच्या वाढत्या संख्येमुळे व्हेंटिलेटरची मोठ्या प्रमाणात गरज भासत आहे. ही बाब लक्षात घेऊन काश्मीरमधील पाच तरुणांनी एकत्र येऊन अवघ्या २० हजारात मिळेल असे व्हेंटिलेटर बनवले आहे. यामुळे गंभीर असलेल्या रुग्णाला दिलासा मिळण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

kashmiri youth made ventilators

- Advertisement -

देशात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी पोलीस, डॉक्टर, परिचारिका, आरोग्य कर्मचारी, स्थानिक प्रशासन सर्वोतोपरी मेहनत घेत आहे. परंतु रुग्नांची वाढती संख्या आणि त्यांना कमी पडणारे व्हेंटिलेटर यामुळे अनेकांना आपला जीव गमवावा लागण्याची शक्यता लक्षात घेत आयआयटी मुंबईच्या आयडीसी विभागातून शिक्षण पूर्ण केलेल्या झुल्करनन या काश्मीरमधील अनंतपुरा येथे राहत असलेल्या विद्यार्थ्याने आपल्या मित्रांच्या मदतीने व्हेंटिलेटर बनवण्याचा निर्णय घेतला. पी.एस. सोहेब, आसिफ, शकर नेहवी, माजिद कौल यांनी एकत्र येऊन व्हेंटिलेटर बनवण्याचा निर्णय घेतला. त्यासाठी त्यांनी एक व्हॉटसअप ग्रुप बनवला आणि त्यामाध्यमातून त्याने व्हेंटिलेटर बनवण्याच्या तयारीला सुरुवात केली. झुल्करनन व त्याच्या मित्रांनी एकत्र येऊन संशोधन करण्यास सुरुवात केली. यामध्ये त्यांनी मार्केटमध्ये सहज उपलब्ध असलेले साहित्यांच्या आधारे व्हेंटिलेटर कसा बनवता येईल यावर अधिक विचार केला. सलग तीन आठवडे काम केल्यानंतर तीन प्रकारचे व्हेंटिलेटर बनवले. यामध्ये तिसरा प्रकार आम्हाला योग्य वाटला. त्यावर आम्ही अधिक काम करण्यास सुरुवात केली. सध्या बाजारात असलेले व्हेंटिलेटर हे उच्च दर्जाचे आणि महाग आहेत. त्यामुळे सध्याच्या परिस्थितीमध्ये व्हेंटिलेटर इतक्या सहज मिळणे शक्य नाही. ही बाब लक्षात घेऊन आम्ही स्वस्त दरात व्हेंटिलेटर बनवण्याचा निर्णय घेतला. सध्या बनवण्यात आलेला व्हेंटिलेटर मेडिकल चाचणीसाठी डॉक्टरांकडे पाठवण्यात येणार आहे. तंज्ंज्ञाकडून याला मान्यता मिळाल्यानंतर हा व्हेंटिलेटर बाजारात येईल. सध्या बाजारात उपलब्ध असलेल्या व्हेंटिलेटरची किंमत सात ते आठ लाख इतकी आहे. परंतु आम्ही बनवलेल्या व्हेंटिलेटर्सची किंमत ही फक्त २० हजार इतकी आहे. त्यामुळे सध्या आरोग्य क्षेत्रात असलेल्या तुटवड्यावर आमच्या व्हेंटीलेटर्समुळे एक पर्याय निर्माण होण्याची शक्यता झुल्करनन याने व्यक्त केली.


हेही वाचा – कोरोना हॉस्पीटलवरून डोंबिवलीत रंगलय राजकारण; सेना-मनसेत सोशल वॉर

- Advertisement -

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -