घरCORONA UPDATECorona Virus: लक्षणे असूनही आईने केले स्तनपान, १४ दिवसांच्या नवजात बाळाचा...

Corona Virus: लक्षणे असूनही आईने केले स्तनपान, १४ दिवसांच्या नवजात बाळाचा कोरोनामुळे मृत्यू

Subscribe

बाळाच्या मृत्यूमुळे बाळाच्या आईला आणि कुटुंबियांना मोठा धक्का बसला आहे.

देशभरात कोरोनाचे थैमान सुरु आहे. ज्येष्ठ नागरिकांपासून ते अगदी नवजात बालकांपर्यंत कोरोनाची लागण होत आहे. लहान मुलांमध्ये कोरोनाचा धोक अधिक असल्याचे समोर आले. नवजात बालकांनाही कोरोनाचा धोका वाढत आहे. गुजरातच्या सुरत येथे एका १४ दिवसांच्या नवजात बालकाला कोरोनामुळे आपला जीव गमवावा लागला आहे. आईला कोरोनाची काही लक्षणे आढळली होती. मात्र तरीही ती बालकाला स्तनपान करत राहिली. त्यामुळे बाळालाही कोरोनाचा धोका निर्माण झाला. मात्र १४ दिवसांत बाळाला कोरोनामुळे आपले प्राण गमवावे लागले. बाळाच्या मृत्यूमुळे बाळाच्या आईला आणि कुटुंबियांना मोठा धक्का बसला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, जन्माच्या दुसऱ्याच दिवशी बाळाची कोरोना चाचणी पॉझिटिव्हा आली. बाळाच्या आईला आधीपासूनच कोरोनाची लक्षणे जाणवली होती मात्र तिने कोणालाही याबाबत कळू दिले नाही. बाळाला तिने स्तनपान सुरु ठेवले. बाळाच्या स्वास्थ्यावर त्याचा विपरित परिणाम झाल्याने बाळाचा मृत्यू झाला. मृत्यू होण्याआधी बाळाला वाचवण्याचे अनेक प्रयत्न करण्यात आले. बाळ सूरतच्या वराछा येथील डायमंड रुग्णालयात होते. कोरोनाच्या उपचारासाठी बाळाला प्लाझ्मा थेरपीही देण्यात आली होती. मात्र बाळाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.

- Advertisement -

महाराष्ट्रासह गुजरातमध्येही कोरोनाची रुग्णसंख्या वाढत आहे. आतापर्यंत गुजरातमध्ये तीन नवजात बाळांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. याआधीही १४ दिवसांच्या बाळाचा कोरोनामुळे श्वास कोंडल्याने मृत्यू झाला आहे.  मुलांमधील कोरोनाचा धोका दिवसेंदिवस वाढत असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे गर्भवती महिलांनीही आपल्यासोबतच आपल्या बाळाची देखिल काळजी घेणे गरजेचे आहे.


हेही वाचा – किराणा दुकान आणि फार्मसी स्टोअरीवरील निर्बंध हटवण्याचे केंद्राकडून राज्य सरकारला आदेश

Minal Gurav
Minal Guravhttps://www.mymahanagar.com/author/minal/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रीय. मनोरंजन,लाईफ स्टाईल विषयात लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -