Corona : केंद्रीय मंत्री नितीन गडकरी कोरोना पॉझिटिव्ह, भाजपच्या मुख्यालयात कोरोनाचा शिरकाव

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी ट्विट करत कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला असल्याची माहिती दिली आहे. गडकरी म्हणाले की, सौम्य लक्षण आढळल्यामुळे कोरोनाची चाचणी केली होती. चाचणीचा अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आला आहे.

Corona virus Nitin gadkari tested corona positive
Corona : केंद्रीय मंत्री नितीन गडकरी कोरोना पॉझिटिव्ह, भाजपच्या मुख्यालयात कोरोनाचा शिरकाव

देशासह राज्यात कोरोना प्रादुर्भावाचा संसर्ग पुन्हा वेगाने पसरतो आहे. कोरोनाच्या तिसऱ्या लाटेमध्ये जास्त प्रमाणात नेत्यांना आणि लोकप्रतिनिधींना कोरोनाची लागण होत आहेत. भाजप नेते आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना कोरोनाची लागण झाली आहे. गडकरींनी स्वतःचा रिपोर्ट कोरोना पॉझिटिव्ह आल्याची माहिती दिली आहे. दिल्लीतील भाजपच्या मुख्यालयातही कोरोनाचा शिरकाव झाला आहे. भाजप मुख्यालयातील 42 कर्मचाऱ्यांना कोरोना संसर्ग झाला आहे. या मुख्यालयात भाजपच्या नेत्यांची बैठक आयोजित करण्यात येते. दिल्लीमध्ये अनेक केंद्रीय मंत्र्यांना कोरोनाची लागण झाली आहे.

भाजपमधील अनेक बड्या नेत्यांना कोरोनाची लागण झाली आहे. भाजप राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, संरक्षण राज्य मंत्री अजय भट यांना कोरोनाची लागण झाली आहे. भाजपचे नेते आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनाही कोरोनाची लागण झाली आहे. गडकरींनी स्वतः ट्विट करुन कोरोना झाला असल्याची माहिती दिली आहे. गेल्या काही दिवसांमध्ये जे जे संपर्कात आले आहेत त्यांना काळजी घेण्याचे आणि कोरोना चाचणी करण्याचे आवाहन नितीन गडकरींनी केलं आहे.

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी ट्विट करत कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला असल्याची माहिती दिली आहे. गडकरी म्हणाले की, सौम्य लक्षण आढळल्यामुळे कोरोनाची चाचणी केली होती. चाचणीचा अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आला आहे. नियमानुसार स्वतःला होम क्वारंटाईन केलं आहे. संपर्कात आलेल्या सर्वांनी कोरोनाची चाचणी करावी आणि स्वतःला आयसोलेट करावे असे आवाहन नितीन गडकरी यांनी केलं आहे.

महाराष्ट्रात कोरोनाबाधित लोकप्रतिनिधींचा आकडा वाढताच

महाराष्ट्रात 13 मंत्री आणि 70 आमदारांना कोरोना झाला असल्याची माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली होती. राज्यात कोरोनाचा संसर्ग प्रचंड वेगाने होत आहे. नगरविकास मंत्री, महसूल मंत्री, शालेय शिक्षण मंत्री यांच्यासह अनेक आमदारांना कोरोनाची लागण होऊन गेली आहे. तसेच काही आमदार कोरोनावर उपचार घेत आहेत.


हेही वाचा : Maratha Reservation : मराठा आरक्षणावरील पुनर्विचार याचिका कोरोनामुळे पुढे ढकलली