घरCORONA UPDATEजागतिक कोरोना अपडेटCoronaVirus - जगात कोरोनाचा कहर, पण उ. कोरियाला मिसाईल खरेदीची लहर!

CoronaVirus – जगात कोरोनाचा कहर, पण उ. कोरियाला मिसाईल खरेदीची लहर!

Subscribe

एकीकडे सगळे देश कोरोना व्हायरसशी लढण्यासाठी कसोशीने प्रयत्न करत असतानाच दुसरीकडे उत्तर कोरिया मिसाईल परिक्षणामध्ये व्यग्र आहेत.

जगभरात कोरोनाचा कहर सुरू आहे. प्रत्येक देश कोरोनाशी लढा देण्यासाठी कसोशीने प्रयत्न करत आहे. पण उत्तर कोरियाचे नेते किम जोंग उन मात्र आपल्या सैन्य ड्रिल निरीक्षणातच व्यग्र आहेत. देशभरात मोठ्या प्रमाणावर कोरोनाचा फैलाव होत आहे. मात्र उत्तर कोरियामध्ये संसदेच सत्र सुरू होत आहे. खरतर उत्तर कोरियात अदयाप कोरोनाचा एकही रूग्ण आढळलेला नाही.

एकीकडे सगळे देश कोरोना व्हायरसशी लढण्यासाठी कसोशीने प्रयत्न करत असतानाच दुसरीकडे उत्तर कोरिया मिसाईल परिक्षणामध्ये व्यग्र आहेत. त्यामुळे सगळीकडून किम जोंग यांच्यावर टीका होत आहे. कारण आपल्या आजूबाजूला काय चाललय याचा जराही फरक किम जोंग यांना पडत नाहीये. त्याचबरोबर किम जोंग यांनी संसदेच काम काज सुरू करून उत्तर कोरियावर मोठं संकट ओढावून घेतलं आहे. कारण उत्तर कोरियाच्या आजूबाजूला असणाऱ्या चीन आणि दक्षीण कोरियात कोरोना व्हायरसने हाहाकार माजवला आहे. या देशात दररोज हाजरो लोक कोरोनाग्रस्त होत आहेत. त्यामुळे उत्तर कोरियात कोरोनाचे संक्रमण होण्याचा मोठी शक्यता वर्तवली जात आहे.

- Advertisement -

कोरोना व्हायरपासून वाचण्यासाठी उत्तर कोरियात कोणतीच काळजी घेतली जात नाहीये. उत्तर कोरियात ना लॉकडाऊन सुरू आहे ना सोशल डिस्टन्सिंगचे कोणतेही नियम पाळले जात नाहीयेत. मात्र उत्तर कोरियात आता सैन ड्रिलच्या बातम्या येत आहेत. उत्तर कोरियात काही नवीन मिसाईलचा आणि सैन्याचा समावेश करण्यात आला आहे. देशाची सुरक्षा आणखी बळकट करण्यासाठी हा निर्णय घेण्यात आल्याचं एका स्थानिक वृत्त एजेंसीने सांगितले आहे.

मात्र आता किम जोंग उन यांच्या संसद सुरू करण्याच्या निर्णयामुळे उत्तर कोरियाचा कोरोनाचा संसर्ग होण्याचा धोका वाढला आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -