घरCORONA UPDATECoronavirus: भारतात प्लाझ्मा थेरपीला सुरुवात

Coronavirus: भारतात प्लाझ्मा थेरपीला सुरुवात

Subscribe

दिल्ली सरकारचे स्वायत्त रुग्णालय, इंस्टिट्यूट ऑफ लीवर एंड बिलिअरी सायंसेस (आयएलबीएस) ने ही चाचणी घेण्याची आधीच परवानगी घेतली आहे.

भारतात कोविड -१९ च्या उपचारांसाठी प्लाझ्मा थेरपीचा वापर सुरू झाला आहे. कोरोना संसर्गापासून मुक्त झालेल्या १६०० लोकांच्या रक्तातील अँटीबॉडीजचा वापर करून डॉक्टर संक्रमित व्यक्तींवर उपचार करणार आहेत. ही थेरपी कोरोनासाठी संभाव्य उपचार मानली जात आहे. हे प्लाझ्मा कोरोना संक्रमणापासून बऱ्या झालेल्या रुग्णांच्या रक्तातून घेतलं जातं. वास्तविक, जेव्हा एखादा विषाणू शरीरावर हल्ला करतो तेव्हा शरीर त्याच्याविरोधात लढण्यासाठी अँटीबॉडीज बनवतं. या थेरपीसाठी काही प्रोटोकॉल तयार केले आहेत.

भारतातील अव्वल आरोग्य संशोधन संस्था, भारतीय आयुर्विज्ञान अनुसंधान परिषद (आयसीएमआर) व्यतिरिक्त, दिल्लीतील दोन रुग्णालयांनी थेरपीच्या परिणामाची चाचणी घेण्यासाठी अर्ज केले आहेत. दिल्ली सरकारचे स्वायत्त रुग्णालय, इंस्टिट्यूट ऑफ लीवर एंड बिलिअरी सायंसेस (आयएलबीएस) ने ही चाचणी घेण्याची आधीच परवानगी घेतली आहे. त्याच वेळी, खासगी रुग्णालय मॅक्सला चाचणीसाठीच्या परवानगीची प्रतीक्षा आहे. केंद्रीय औषध मानक नियंत्रण संगटनने म्हटलं आहे की, ‘सर्व प्रकारच्या केंद्रांवर एकाच प्रकारची चाचणी घेतली जाईल. आयसीएमआर प्रोटोकॉलनुसार रुग्णालयांना मंजूर दिली जात आहे, जेणेकरुन सर्व केंद्रांकडून एकसमान व तुलनात्मक डेटा मिळावा.

- Advertisement -

हेही वाचा – रतन टाटांना ‘भारतरत्न’ द्या; ऑनलाईन याचिकेला लाखोंचा पाठिंबा


आयएलबीएसचे संचालक डॉ. एसके सरीन म्हणाले की, देशातील एक हजाराहून अधिक लोक आता कोविड -१९ संसर्गापासून मुक्त झाले आहेत. त्यांच्या रक्तातील प्लाझ्माचा उपयोग गंभीर रुग्णांवर उपचार करण्यासाठी केला जाईल. बरे झालेल्या लोकांमधील अँटीबॉडीज गंभीर रूग्णांना संसर्गाविरूद्ध लढण्यास मदत करतात.

- Advertisement -

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -