घरCORONA UPDATEकोरोना विषाणू हवेतून पसरतो, जागतिक आरोग्य संघटनेनेही केलं मान्य

कोरोना विषाणू हवेतून पसरतो, जागतिक आरोग्य संघटनेनेही केलं मान्य

Subscribe

नवी दिल्ली – संपूर्ण जगाला वेठीस धरणारा कोरोना विषाणू (Corona Virus) हवेतून पसरत असल्याचं संशोधन समोर आलं आहे. तसंच, जागतिक आरोग्य संघटनेनेही या संशोधनालाही पुष्टी दिली आहे. (Corona Virus Spread Through Air)

कोरोना हा संसर्गजन्य रोग असल्याने तत्काळ पसरत जातो. त्यामुळे चीनमधील या विषाणून संपूर्ण जगात धुमाकूळ माजवला होता. त्यामुळे कोरोनाच्या उत्पत्तीचा शोध सुरू आहे. जगभरात विविध संशोधक या विषाणूवर संशोधन करत आहेत. अशाच एका संशोधनातून कोरोना विषाणू हवेतून पसरत असल्याचं सिद्ध झालं आहे. हवेतील लहान कणांचा अभ्यास करणारे शास्त्रज्ञ लिन्सी मार यांनी त्यांच्या टीमसह हे संशोधन केले आहे. या संशोधनाचा अहवाल त्यांनी जागतिक आरोग्य संघटनेलाही पाठवला होता. जागतिक आरोग्य संघटनेनेही या अहवालाला पुष्टी दिली आहे. त्यामुळे कोरोना विषाणू हवेतून पसरत असल्याची माहिती जागतिक आरोग्य संघटनेने संकेतस्थळावरही प्रसिद्ध केली आहे.

- Advertisement -

हेही वाचा – कोरोनातून सुटले अन् चेंगराचेंगरीत अडकले, 300हून अधिक लोकांनी गमावला जीव

दरम्यान, गेल्या २४ तासांत देशात १ हजार ६०४ नवे कोरोना रुग्ण सापडले आहेत. शनिवारी हा आकडा १ हजार ५७४ इतका होता. तर, गेल्या २४ तासांत देशात आठ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तर, शनिवारी १९ रुग्णांच्या मृत्यूंची संख्या नोंदवली होती. देशात सद्या १८ हजार रुग्णांवर उपचार सुरू असून गेल्या २४ तासांत ८१ रुग्ण कोरोनातून बरे झाले आहेत.

- Advertisement -

महाराष्ट्रात शनिवारी ३१९ नव्या रुग्णांची नोंद झाली होती. तर, ४०६ रुग्ण बरे होऊन घरी परतले होते. दुसरीकडे, राज्यात एक्सबीबी या व्हेरियंटचे एकूण ३६ रुग्ण सापडले आहेत. यामध्ये पुण्यात सर्वाधिक रुग्ण आहेत.

Sneha Kolte
Sneha Koltehttps://www.mymahanagar.com/author/skolte/
6 वर्षांचा माध्यम क्षेत्रात अनुभव. राजकारण, मनोरंजन विषयात लिखाणाची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -