Friday, April 16, 2021
27 C
Mumbai
घर ट्रेंडिंग COVID-19 Testing आता मेडिकलमध्ये; १ तासात मिळणार रिपोर्ट

COVID-19 Testing आता मेडिकलमध्ये; १ तासात मिळणार रिपोर्ट

Related Story

- Advertisement -

जगभरासह देशात कोरोनाचा कहर काही केल्या कमी होताना दिसत नाही. दिवसेंदिवस कोरोनाचा संसर्ग नियंत्रणात राखण्यासाठी देशभरात कोरोना लसीकरण मोहीम मोठ्याप्रमाणात सुरू आहे. दरम्यान, कोरोनाची लस घ्यायची असेल तर कोरोना लसीकरण मोहीमेच्या प्रक्रियेतून जावे लागते. मात्र जेवढ्या सहजतेने ब्लड शुगर टेस्ट केली जाते त्याचप्रमाणे आता कोरोनाची टेस्ट करणं देखील सहज शक्य होणार आहे. संशोधकांनी अशी लहानशी चिप तयार केली आहे, जिचा आकार स्टॅमच्या आकाराइतकाच लहानसा आहे. ज्याद्वारे कोविड -१९ टेस्ट करणं सोयिस्कर होणार आहे. इतकेच नव्हे तर या टेस्टचा रिझल्ट अवघ्या एका तासात तुमच्या स्मार्टफोनवर उपलब्ध होणार असल्याचे सांगितले जात आहे.

मायक्रोफ्लूइडिक चिप ब्लड सीरममधील सार्स-कोवी-२ न्यूक्लियोकैप्सिड (एन) प्रोटीनची मात्रा तपासेल. हे ब्लड सीरम हाताच्या एका बोटात सूई टोचून जमा केला जाते. ही प्रक्रिया इतकी सोपी आहे की तुम्ही तुमच्या जवळच्या मेडिकल स्टोअरमध्ये जाऊन देखील ही कोरोना टेस्ट करू शकतात आणि विशेष म्हणजे या टेस्टचा रिपोर्ट तासाभरात जाणून घेऊ शकतात. यासाठी तुम्हाला तुमच्या बल्डचे सॅम्पल कोणत्याही प्रयोगशाळेत नेण्याची गरज भासणार नाही. मिळालेल्या माहितीनुसार, ही कोरोना टेस्ट करणारी लहानशी चिप राइस विद्यापीठाच्या संशोधकांनी तयार केली आहे. यासोबतच हे संशोधन एसीएस सेन्सर्स या जर्नलमध्ये प्रकाशित करण्यात आले आहे. या संशोधनानुसार, चिपमधील नॅनोबीड्स सार्स-कोव्ह -२ एन शरिरातील प्रोटिन्सना चिटकतात. त्यानंतर इलेक्ट्रोकेमिकल सेन्सरमध्ये जातात. हा सेन्सर कमी प्रमाणात बायोमार्कर्स देखील सहज शोधू शकतो, असे सांगितले जात आहे.

- Advertisement -

संशोधकांच्या मते, सध्या कोरोना टेस्ट करण्यासाठी जी प्रक्रिया केली जाते त्यापेक्षा या चिपद्वारे कोरोना टेस्ट करणं सहज सोपं होणार आहे. सध्या स्वॅब घेऊन पीसीआर टेस्ट घेतली जाते. राइस लॅबचे मेकॅनिकल अभियंता पीटर लिलिझोज यांच्या म्हणण्यानुसार, या डिव्हाइसला कोरोना तपासणीसाठी प्रयोगशाळेची आवश्यकता नाही, तर या चिपद्वारे होणारी टेस्च हेल्थ क्लीनिक किंवा कोणत्याही औषध मेडिकल स्टोअरमध्ये देखील करता येऊ शकते. या व्यतिरिक्त ही चिप वापरण्याची संपूर्ण प्रक्रिया अगदी सुलभ असल्याचे सांगितले जात आहे.


Google Map सांगणार Eco-Friendly रस्ते! वाचा सविस्तर

- Advertisement -