घरताज्या घडामोडीCorona Virus चा उद्रेक २० हजार वर्षांपूर्वीच झाल्याचे संशोधनातून उघड

Corona Virus चा उद्रेक २० हजार वर्षांपूर्वीच झाल्याचे संशोधनातून उघड

Subscribe

कोरोनासारख्या महामारीत घातक ठरत असणाऱ्या कोरोना व्हायरसची पाळमुळ ही २० हजार वर्षांपूर्वीच काही देशांमध्ये आढळली असल्याचे एका संशोधनातून समोर आले आहे. याआधीच महाकाय अशा तीन व्हायरसमुळे लाखो लोकांचा जीव गेला होता. सध्या जगभरात थैमान घातलेल्या कोरोना व्हायरसची उत्पत्तीही हजारो वर्षापूर्वी झाला असल्याचे अभ्यासातून मांडण्यात आले आहे. ऑस्ट्रेलियन नॅशनल युनिवर्सिटीच्या एका अभ्यासातून पूर्व आशियामध्ये २० हजार वर्षांपूर्वीच कोरोनाचा उद्रेक झाल्याची माहिती मांडण्यात आली आहे. चीन, जपान, व्हिएतनाम यासारख्या देशातील नागरिकांच्या डीएनएमध्ये कोरोनाचा अंश आढळून आल्याचे निदर्शनास आले आहे. यॅसिन सोईल्मी आणि रे टॉबलर यांच्या करंट बायोलॉजी जरनलमध्ये प्रकाशित झालेल्या अभ्यासामध्ये हा दावा करण्यात आला आहे. कोरोना व्हायरस फॅमिलीच्या ४२ जीन्सच्या माध्यमातून एका पिढीनंतर दुसऱ्या पिढीमध्ये हा व्हायरस विकसित होत गेल्याची माहिती आहे.

कोरोनाच्या महामारीसाठी काही भौगोलिक स्थाने ही उत्पत्तीची ठिकाणे असल्याचे निदर्शनास आले आहे. त्यामध्ये प्रामुख्याने पूर्व आशियाई देशांचा समावेश आहे. त्यामुळेच पूर्व आशियाईतील लोकसंख्येमध्ये या व्हायरसचा अंश असल्याची शक्यताही वर्तवण्यात आली आहे. याआधीही महामारीचे प्रकार आढळले होते. एकट्या २० व्या शतकामध्ये इन्फ्लुएन्झा व्हायरसचे तीन प्रकार आढळल्याने लाखो लोकांचा मृत्यू झाला होता. त्यामध्ये स्पॅनिश फ्लू हा १९१८-२० दरम्यान अनेक मृत्यूंसाठी कारणीभूत ठरला होता. त्याप्रमाणेच १९५७ -५८ चा एशियन फ्लू आणि १९६८-६९ चा हॉंगकॉंग फ्लूदेखील लाखो मृत्यूंसाठी कारणीभूत ठरला. अभ्यासकांच्या मते व्हायरसच्या उत्पत्तीला अनेक वर्षांचा इतिहास आहे. अभ्यासकांच्या मते व्हायरसच्या उद्रेकासाठी हजारो वर्षांचा इतिहास आहे. आफ्रिकेतील वंशजांपासूनच जगभरात हा व्हायरस पसरल्याचा उल्लेखही अभ्यासात मांडण्यात आला आहे. वर्षानुरूप या व्हायरसच्या संसर्गासाठीचा प्रतिकार आणि व्हायरसवर मिळवलेले नियंत्रण हेच बचावाचे कारण ठरत गेले.

- Advertisement -

सौलमी आणि टॉबलर यांनी कटिंग एज कॉम्प्युटेशनल एनेलिसीसच्या माध्यमातून जवळपास २५०० लोकांच्या जिनोम्सचा अभ्यास करण्यात आला. जगभरातील २६ ठिकाणच्या लोकसंख्येतून तसेच ४२ वेगवेगळ्या ह्युमन जीन्सच्या माध्यमातून व्हायरस इंटरएक्टिंग प्रोटीन्स (व्हीआयपी) चा अभ्यास यानिमित्ताने करण्यात आला. हे व्हीआयपी सिग्नल फक्त पाच ठिकाणच्या लोकसंख्येत आढळले आहेत. प्रामुख्याने दक्षिण आशियाई लोकसंख्येमध्ये हे सिग्नल आढळले आहेत. त्यामुळेच कोरोना व्हायरससारख्या विषाणूला ही लोकसंख्या २५ हजार वर्षांपूर्वीच संपर्कात आल्याचे या अभ्यासातून मांडण्यात आले आहे. अधिकच्या चाचण्यानंतर या ४२ व्हीआयपी सिग्नलचा संबंध हा कोरोनाच्या लक्षणांशी मिळता जुळता आला आहे. त्यामुळेच या व्हीआयपी जिन्सचा वापर हा औषध निर्मितीसाठी होऊ शकतो किंवा क्लिनिकल ट्रायल्ससाठी होऊ शकतो. तसेच कोरोनाची आणखी लक्षणे शोधण्यासाठीही या व्हीआयपीचा वापर होऊ शकतो असे संशोधकांचे मत आहे.

या अभ्यासाच्या निमित्ताने भविष्यातील महामारीच्या बाबतीतल्या शक्यताही वर्तवण्यात येत आहेत. संशोधकांनी अभ्यासाच्या माध्यमातून MERS, SARS या व्हायरसच्या फॅमिलीचाही अभ्यास स्पष्ट केलेला आहे. कोरोना व्हायरसमुळे श्वसनाच्या अनेक विकारांना सामोरे जावे लागले आहे. परिणामी जगभरात ३८ लाख इतक्या मोठ्या प्रमाणात मृत्यू झाले आहेत. परिणामी अब्जावधी डॉलर्सचेही नुकसान जगभरात झाले आहे.

- Advertisement -

 

Kiran Karande
Kiran Karandehttps://www.mymahanagar.com/author/kiran/
१२ वर्षांपासूनचा प्रिंट, डिजिटल असा प्रसारमाध्यम क्षेत्रातील अनुभव. वाहतूक, शिक्षण, नागरी सुविधा, ऊर्जा, हवामान विषयावर लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -