घरCORONA UPDATECoronavirus: अमेरिकेत २ हजार जणांचा मृत्यू; ट्रंप बोलतात क्वारंटाईनची गरज नाही

Coronavirus: अमेरिकेत २ हजार जणांचा मृत्यू; ट्रंप बोलतात क्वारंटाईनची गरज नाही

Subscribe

अमेरिकामध्ये आतापर्यंत कोरोनाग्रस्तांचा आकडा १ लाख २३ हजार ७८१ वर पोहोचला आहे.

जगातील सर्वात शक्तिशाली देशात कोरोना विषाणूचा प्राणघातक उद्रेक अजूनही सुरू आहे. एकीकडे कोरोनाबाधीत रुग्णांमध्ये सातत्याने वाढ होत असताना मृतांच्या संख्येतही वाढ होत आहे. कोरोना विषाणूबद्दल अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रंप म्हणाले की क्वारंटाईनची आवश्यकता नाही. आज रात्री सीडीएस याबद्दल निर्णय घेईल. अमेरिकामध्ये आतापर्यंत कोरोनाग्रस्तांचा आकडा १ लाख २३ हजार ७८१ वर पोहोचला आहे. त्याचबरोबर मृतांची संख्या वाढून २ हजार २२९ झाली आहे. या व्यतिरिक्त ३ हजार २३८ रुग्ण बरे झाले आहेत. न्यूयॉर्कमध्ये सर्वात जास्त ५३ हजार ४५५ रुग्ण आढळले असून ८८३ जणांनी आपला जीव गमावला आहे. दरम्यान, अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी ट्विट केले की व्हाईट हाऊसच्या कोरोना व्हायरस टास्क फोर्सने न्यूयॉर्कमध्ये कडक प्रवासी सल्लागार जारी करण्याच्या सूचना दिल्या आहेत.

अमेरिकेचे सरकार भारतात कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर लावण्यात आलेल्या लॉकडाऊन दरम्यान भारतात अडकलेल्या अमेरिकन नागरिकांना बाहेर काढण्यासाठी व्यवस्था करीत आहे. अमेरिकेचे अधिकारी इयान ब्राउनली शुक्रवारी म्हणाले की, अमेरिकन नागरिकांना थेट भारतातून परत आणण्यासाठी आम्ही अमेरिकन आणि परदेशी उड्डाण सेवांशी बोलत आहोत. ते म्हणाले की भारत आणि अमेरिका या दोन्ही देशांकडून परवानगी मिळण्यास थोडा वेळ लागेल.

- Advertisement -

हेही वाचा – Coronavirus: कोरोनाची लक्षणे दिसत नसली तरीही व्हायरस शरीरात राहतो?


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -