Tuesday, May 11, 2021
27 C
Mumbai
घर देश-विदेश corona virus update : भारतातील कोरोना संसर्ग 'या' कारणासाठी जगासाठी ठरु शकते...

corona virus update : भारतातील कोरोना संसर्ग ‘या’ कारणासाठी जगासाठी ठरु शकते संकट

Related Story

- Advertisement -

भारतात कोरोनाचा दुसऱ्या लाटेने कहर केला आहे. देशासह जगभरात वाढणाऱ्या कोरोना रुग्णसंख्येमुळे आरोग्य व्यवस्थेसमोर मोठे आव्हान उभे राहिले आहे. दरम्यान भारतातील कोरोनास्थिती अगदी बिकट होत असल्याने अनेक देशांनी मदतीचा हात पुढे केला आहे. परंतु भारतातील वाढते कोरोना संकट जगातील इतर देशांसाठी मोठे संकट ठरु शकते असे म्हटले जात आहे. त्यामुळे भारतातील कोरोनास्थितीवर संपूर्ण जगाचे लक्ष लागून आहे. यावर बोलताना जागतिक आरोग्य संघटनेचे प्रमुख वैज्ञानिक डॉ. सौम्या स्वामीनाथन सांगतात, कोणत्याही आजारास कारणीभूत असणारा विषाणू देशांचा सीमा, लिंग, धर्म, जात, वय पाहत नाही. त्यामुळे आत्ताचा कोरोना महामारीमुळे असे स्पष्ट होते की, एखाद्या देशात घातक विषाणू वाढल्यास इतर देशांनाही त्याचा धोका निर्माण होतो.

भारतात सध्या कोरोना विषाणूचा नवा स्ट्रेन समोर येत आहे. भारतातील या विषाणूचा नव्या स्ट्रेन B.1.617 या नावाने ओळखले जात असून सर्वात घातक असल्याचे समोर आले आहे. या विषाणूच्या स्पाइकवर आसलेल्या दोन म्युटेशनमुळे त्यांना डबल म्युटेंट असे म्हटले जात आहे. दरम्यान या नव्या व्हेरिएंटवर सध्या संशोधन सुरु असल्याने त्याचा संसर्ग रोखणे मोठे आव्हान आहे.

- Advertisement -

दरम्यान एखाद्या देशात करोनाचे सर्वाधिक रुग्ण आढळत असल्यास विषाणूचा नवा स्ट्रेन समोर येण्याची दाट शक्यता असते. एखादा म्युटेशन लशीचा काही परिणाम होत नाही. त्यामुळे संसर्गाचा धोका अधिक वाढतो. या नव्या स्ट्रेनला सुरुवातीच्या टप्प्यात अटकाव करु शकतो परंतु त्यासाठी विषाणूला, आजाराला जागतिक स्तरावर अधिक फैलावू न देण्याची मोठी खबरदारी घ्यावी लागते. यामध्ये लॉकडाउन, सोशल डिस्टेसिंगच्या नियमांचे पालन आदी उपाययोजना आखणे हे निर्णय योग्य ठरतात, यात लसीकरण ही महत्त्वाचे असल्याचे तज्ज्ञांनी सांगितले.

डॉ. सौम्या स्वामीनाथन यांनी सांगितले की, लसीकरण मोहिमेला वेग सुरु करण्याची गरज आहे. अन्यथा विषाणूचा संसर्ग वेगाने सुरु राहिल. दरम्यान जागतिक पातळीवर अद्यापही विषाणूचा प्रभाव कमी झालेला नाही. हा विषाणू एका देशातून दुसऱ्या देशात फैलावत आहे. भारतातील स्थिती पाहता हे स्पष्ट होते की, जगातील प्रत्येकजण सुरक्षित असल्याशिवाय इतर कोणीही सुरक्षित नसणार असेही त्यांनी म्हटले.


- Advertisement -

 

- Advertisement -