Thursday, August 5, 2021
27 C
Mumbai
my-mahanagar-most-viewed-video
घर देश-विदेश Covid-19 Vaccine: भारतीय ७ फार्मा कंपन्या कोरोना लस बनवण्याच्या स्पर्धेत!

Covid-19 Vaccine: भारतीय ७ फार्मा कंपन्या कोरोना लस बनवण्याच्या स्पर्धेत!

Related Story

- Advertisement -

देशात कोरोनाचा संसर्ग अद्याप पूर्णतः नाहीसा झाला नसल्याने कोरोना लसीकरण मोहीम देशभरात वेगाने सुरू आहे. जास्तीत जास्त देशातील नागरिकांचे लसीकरण व्हावे यासाठी केंद्र सरकार प्रयत्नशील असताना एक दिलासादायक बातमी समोर आली आहे. सात भारतीय फार्मा कंपन्या सध्या कोरोनाविरूद्ध लस तयार करणार असल्याचे सांगितले जात आहे. यामध्ये भारत बायोटेक, सीरम इन्स्टिट्यूट, झाइडस कॅडिला, पॅनासिया बायोटेक, इंडियन इम्यूनोलॉजिकल, मिनवॅक्स आणि बायोलॉजिकल या फार्मा कंपन्यांचा समावेश असणार आहे. सामान्यतः लसीची चाचणी करण्यासाठी किंवा ती लस विकसित करण्यास काही वर्षे लागतात, परंतु सध्याची परिस्थिती लक्षात घेता, काही महिन्यांत कोरोनाविरूद्ध लस विकसित करण्याचे शास्त्रांचे ध्येय आहे.

भारत बायोटेकला कोव्हॅक्सिन या नावाने विकसित केलेल्या लसच्या क्लिनिकल चाचण्यांना मान्यता मिळाली असून गेल्या आठवड्यात त्याची क्लिनिकल ​​चाचणी सुरू झाली असल्याचे सांगितले जात आहे. सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियानेही या वर्षाच्या अखेरीस ही लस विकसित होण्याची आशा व्यक्त केली आहे. सध्या अ‍ॅस्ट्रॅजेनेका ऑक्सफोर्ड लसीवर काम करत असून तिच्या तिसऱ्या टप्पातील क्लिनिकल चाचणीला सुरूवात झाली आहे. ऑगस्ट २०२० मध्ये या लसीची चाचणी भारतातही सुरू केली जाणार आहे. सध्याच्या निकालांच्या आधारे ही लस या वर्षाच्या अखेरीस उपलब्ध होणार असल्याचे सांगितले जात आहे. पूनावाला यांनी दिलेल्या माहितीनुसार, सीरम संस्थेने अ‍ॅस्ट्रॅजेनेकाबरोबर भागीदारी केली असून एक अब्ज लसी तयार केल्या आहेत. ऑक्सफोर्ड विद्यापीठाने ही लस विकसित केली आहे.

- Advertisement -

फार्मा कंपनी झाइडस कॅडिला यांनी झिको व्ही-डी नावाने तयार केलेल्या लसीची क्लिनिकल चाचणीही सुरू केली आहे. सात महिन्यांत क्लिनिकल चाचणी पूर्ण होणार असल्याची अपेक्षा कंपनीची आहे. हैदराबादस्थित भारत बायोटेकने पोस्ट ग्रॅज्युएट इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस, रोहतक येथे क्लिनिकल चाचण्या सुरू केल्या करण्यात आले आहेत. इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च आणि नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ व्हायरोलॉजी यांच्या संयुक्त विद्यमाने कंपनीने ही लस विकसित केली आहे.

लसीचे परिक्षण हे चार टप्प्यात केले जाते. पहिला टप्पा हा प्री-क्लिनिकल चाचणीचा असून ज्यामध्ये प्राण्यांवर चाचणी केली जाते. यानंतर पहिल्या टप्प्यातील क्लिनिकल चाचणी पूर्ण होते, ज्यामध्ये लस किती सुरक्षित आहे हे पाहण्यासाठी लहान समुहाची चाचणी केली जाते. तसेच दुसऱ्या टप्प्यातील क्लिनिकल चाचणीमध्ये, लस किती सुरक्षित आहे हे पाहण्यासाठी मोठ्या समुहाची चाचणी केली जाते. तिसऱ्या टप्प्यात, अनेकांना लस दिलेल्यानंतर होणाऱ्या परिणामाची तपासणी केली जाते.


युरोपात १०० वर्षात पहिल्यांदाच मुसळधार पावसाचे थैमान, आत्तापर्यंत ५५ लोक ठार, तर १३०० हून अधिक बेपत्ता

- Advertisement -