घरताज्या घडामोडीCoronaVirus: आठ महिन्यांची गर्भवती करतेय कोरोना रुग्णांची सेवा!

CoronaVirus: आठ महिन्यांची गर्भवती करतेय कोरोना रुग्णांची सेवा!

Subscribe

देशात कोरोना विषाणूचा फैलाव दिवसेंदिवस वाढत आहे. या कोरोनाच्या संकटाला डॉक्टर्स, नर्सेस, पोलिस आणि इतर कर्मचारी खंबीरपणे सामना करत आहे. आपले कर्तव्य चोखपणे पार पाडत आहेत. सध्या सोशल मीडियावर एक फोटो खूपच चर्चेत आला आहे. हा फोटो छत्तीसगडमधील आरोग्य महिला कर्मचारीचा आहे. ती गर्भवती असून तिला आठवा महिना सुरू आहे. तरी देखील ती या कोरोनाच्या संकटात आपल्या महत्त्वपूर्ण भूमिका बजावत आहे. या महिलेचं नावं संतोषी माणिकपुरी असून ती कोरोनापासून बचाव करण्याकरिता अहोरात्र लोकांची सेवा करत आहे.

- Advertisement -

छत्तीसगड मधील कोन्दागाव जिल्हातील आरोग्य कल्याण केंद्रात आरोग्य समन्वयक म्हणून नियुक्त झालेल्या संतोषी माणिकपुरी आठ महिन्यांची गरोदर आहे. परंतु आपली भूमिका निभावण्यासाठी आपल्या भागात खंबीरपणे ती उभी राहिली आहे. इतर राज्यातील ग्रामीण मजुरांना मास्क लावणे, सोशल डिस्टन्सिंग ठेवणे, हात धुणे अशा प्रकारच्या सुचना ती देत असते. ती केरवाही आणि ग्रामपंचायत वड्रा येथील ५० हून अधिक राज्यातून आलेल्या मजुरांची ओळख पटवून आणि त्यांच्या घरोघरी जाऊन व्हायरसपासून बचाव करण्यासाठी सल्ला देत आहे.

एएनआयशी बोलताना तिने सांगितलं की, दिवसभर काम करू रात्री खूप त्रास होतो. कधी कधी पाठदुखीमुळे मला रात्री झोप येत नाही. पण सकाळी उठल्यानंतर देवाकडून काम करण्याचे बळ मिळते. अशा अवस्थेत जेव्हा रुग्णांवर उपचार करते तेव्हा मला आनंद होतो.

- Advertisement -

हेही वाचा – CoronaVirus: मध्य प्रदेशातील पोलिस अधिकाऱ्याची कोरोनाशी झुंज अयशस्वी!


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -