२०२२ मध्ये संपणार कोरोना महामारी, WHO प्रमुखांचा मोठा दावा

union health ministry issues revised guidelines for home isolation of mild asymptomatic covid patients
Guidelines for Home isolation : होम क्वारंटाईनबाबत केंद्राच्या नव्या गाईडलाईन्स जारी; काय आहेत सूचना?

जगभरात नवं वर्षाचे मोठ्या उत्साहात स्वागत होत आहे. असे असतानाही कोरोनाचे संकट अद्याप संपलेले नाही. यात अनेक देशांमध्ये ओमिक्रॉन व्हेरिएंटने हातपाय पसरायला सुरुवात केली आहे. भारत, ब्रिटन, अमेरिका, दक्षिण आफ्रिका, युरोप अशा अनेक देशांमध्ये कोरोनाचे सर्वाधिक रुग्ण आढळून आले आहेत. अशातच आता दिलासाजनक बातमी समोर आली आहे. २०२२ या नव वर्षात कोरोना महामारी संपेल असे दावा जागतिक आरोग्य संघटना प्रमुखांनी केला आहे. जागतिक आरोग्य संघटना प्रमुखांनी म्हटले की, जगातील सर्व देशांच्या सरकारने कोरोना महामारी संपवण्यासाठी मिळून काम केले पाहिजे.

जागतिक आरोग्य संघटनेचे प्रमुख टेड्रोस अॅडनोम गेब्रेयसस यांनी म्हटले की, २०२२ या नवं वर्षात सर्वांनी मिळून कोरोनावर मात करुया. यात सर्व देशांनी एकत्र मिळून काम केले पाहिजे. येत्या वर्षात कोरोना महामारी संपवायची असेल तर विषमता संपावायला हवी. यासाठी प्रत्येक देशांने किमान ७० टक्के जनतेचे जून २०२२ पर्यंत लसीकरण पूर्ण करणे आवश्यक आहे. आपातकालीन वापरासाठी नव्याने मंजुरी मिळालेल्या नोवाव्हॅक्स लसीच्या वापराबाबतचे निर्देश जारी केले आहे. नोवाव्हॅक्स ही लस सीरम इन्सिस्ट्यूट ऑफ इंडिया कंपनीने निर्मित केली आहे. त्यामुळे जगभरातील कोरोना लसीकरणात नवीन लस मदत करेल असंही यावेळी जागतिक आरोग्य संघटनेच्या प्रमुखांनी म्हटले आहे.

यावर गेब्रेयसस यांनी म्हटले की, २०२१ वर्षात कोरोनामुळे जवळपास ३३ लाख नागरिकांचा मृत्यू झाला. एचआयव्ही, मलेरिया आणि क्षयरोगाच्या मृत्यूपेक्षा हे प्रमाण अधिक आहे. सध्या दर आठवड्याला सुमारे ५० हजार लोकांचा मृत्यू होतोय. याशिवाय सर्वाधिक मृत्यूची नोंद नाही.


Florona: कोरोना ,डेल्टा आणि ओमिक्रोन नंतर आता आला फ्लोरोना