धोका वाढला! पुढच्या आठवड्यात दिल्ली-मुंबईत कोरोना हाहाकार माजवणार

देशात कोरोनाचा नवा व्हेरिएंट ओमिक्रॉन विषाणूचा संसर्ग वेगाने पसरत आहे. त्यातच नवी दिल्ली आणि मुंबईसारख्या महानगरमध्ये कोरोनाचा धोका मोठ्या प्रमाणात वाढत चालला आहे. आरोग्य तंज्ज्ञांच्या माहितीनुसार,भारतात कोरोनाचा नवा व्हेरिएंट ओमिक्रॉनच्या नव्या रुपात तिसरी लाट आली आहे.

Corona will roar in Delhi Mumbai next week

गेल्या दोन वर्षापासून संपूर्ण जगात कोरोनाचे थैमान सुरु आहे. त्यातच देशात कोरोनाचा नवा व्हेरिएंट ओमिक्रॉन विषाणूचा संसर्ग वेगाने पसरत आहे. त्यातच नवी दिल्ली आणि मुंबईसारख्या महानगरांमध्ये कोरोनाचा धोका मोठ्या प्रमाणात वाढत चालला आहे.आरोग्य तंज्ज्ञांच्या माहितीनुसार, भारतात कोरोनाचा नवा व्हेरिएंट ओमिक्रॉनच्या नव्या रुपात तिसरी लाट आली आहे. फेबुवारी महिन्यात ही तिसऱ्या लाट उच्चांक गाठणार असून, दिल्ली आणि मुंबईत कोरोना हाहाकार माजवणार आहे. जानेवारी महिन्याच्या अखेरीस देशात दररोज कोरोना संसर्गाची ८ लाख प्रकरणे सापडण्याची शक्यता आहे. येत्या तीन ते चार दिवसांत याची माहिती असल्याचे आयआयटी कानपूरचे प्राध्यापक आणि गणितज्ञ मिलिंद अग्रवाल यांनी सांगितले आहे.

कोरोनाची तिसरी लाट दिल्ली मुंबईत आली असून, दिल्लीत दररोज 50 ते 60 हजार प्रकरणे सापडतील तसेच, मुंबईत 30 हजार प्रकरणे नोंदवली जाणार असल्याची शक्यता मिलिंद यांनी वर्तवली आहे. ही महामारी केव्हा संपुष्टात येणार या प्रश्नावर मिलींद यांनी एका मुलाखतीत उत्तर दिले की, कोणत्याही महामारीचा जश्याप्रकारे वेगाने प्रसार होतो त्याच वेगाने या विषाणूची घट होऊ शकते. त्यामुळे काही दिवसांनी या विषाणूच्या रुग्णांमध्ये वेगाने घट झालेली पाहायला मिळेल. कारण अशी परिस्थिती आफ्रिकामध्येसुद्धा पाहायला मिळाली आहे.

ओमिक्रॉननंतर आता घातक deltacron ची एन्ट्री

कोरोनाच्या नवनव्या व्हेरिएंटमुळे जगाची झोप उडाली आहे. यातच जग कोरोनाच्या डेल्टा व्हेरिएंटमधून सावरल्यानंतर  ओमिक्रॉनचा धोका वाढतोय. अशातच सायप्रसच्या एका शास्त्रज्ञाने कोरोनाच्या नव्या व्हेरिएंटचा शोध घेतला आहे. हा व्हेरिएंट डेल्टा आणि ओमिक्रॉन व्हेरिएंटचे मिश्रण असल्याचे सांगितले जात आहे. त्याला डेल्टाक्रॉन असे नाव देण्यात आले आहे.


हेही वाचा – Mumbai Byculla Fire : भायखळ्यातील मुस्तफा बाग परिसरातील लाकडाच्या गोदामाला भीषण आग