घरदेश-विदेशCoronasomnia: कोरोना महामारीने जगातील ६० टक्के लोकांची उडाली झोप!

Coronasomnia: कोरोना महामारीने जगातील ६० टक्के लोकांची उडाली झोप!

Subscribe

सध्या कोरोना महामारीने सर्वाच्याच मानसिकतेवर परिणाम केला आहे. यासोबतच आता जगातील काही लोकं असेही आहे, ज्यांना अंथरूनावर झोपायला गेल्यास शांत झोप लागत नाही, त्यांच्या मनात अनेक प्रश्नांचा गोंधळ उडाल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे कित्येक लोकांची झोप या कोरोना महामारीमध्ये गायब झाली आहे. कोरोना दरम्यान, जगभरात ताण-तणाव आणि भीतीमुळे मोठ्या संख्येने लोकांचा निद्रानाश झाल्याचे समोर आले आहेत. तज्ज्ञांच्या मते, यावेळी आपण ‘कोरोनासोम्निया’ या आजारातून जात आहोत. ज्यामुळे अनेकांची झोप उडाली आहे.

४१ टक्के प्रौढ लोक अधिक चिंताग्रस्त

कोरोना महामारी दरम्यान गेल्यावर्षी, अमेरिकन अॅकॅडमी ऑफ स्लीप मेडिसिनने हजारो प्रौढांवर या संदर्भात सर्वेक्षण केले तेव्हा असे आढळले की, केवळ २०% लोकांची झोप उडाली आहे. परंतु, यानंतर जेव्हा १० महिन्यांनंतर या वर्षी पुन्हा हेच सर्वेक्षण केले गेले, तेव्हा महामारीमुळे शांत झोप न येणाऱ्या लोकांची संख्या वाढून ६० टक्क्यांपर्यंत पोहोचली आहे. यापैकी अर्ध्या लोकांनी असे सांगितले की, त्यांची झोपेची गुणवत्ता प्रचंड खराब झाली आहे. सध्या, कोरोना संक्रमण कमी होत आहे. परंतु ४१ % प्रौढांनी म्हटले आहे की, वर्षभरापूर्वी असणाऱ्या कोरोना संक्रमणापेक्षा ते लोकं यंदाच्या कोरोना कालावधीच्या जास्त घाबरले आहेत.

- Advertisement -

झोप चांगली यावी, यासाठी तज्ज्ञांकडून उपाय

तज्ज्ञांच्या मते, सर्वात प्रभावी उपचारांपैकी एक म्हणजे कॉग्निटिव बिहेवियर थेरपी (सीबीटी). याद्वारे तुमच्या झोपेत येणारे अडथळे, विचार, काळजी, भावना यावर नियंत्रण मिळवले जाते. यामुळे तुमची झोप सुधारू शकते, असेही काही सीबीटी-प्रेरित मार्ग आहेत. जेव्हा तुम्ही रात्री झोपायला गेलात आणि २५ मिनिटे होऊन गेलेत तरी तुम्हाला झोप येत नसेल तर अंथरुणावरुन उठा. कॅलिफोर्निया विद्यापीठातील न्यूरोसाइन्स तज्ज्ञ डॉ. मॅथ्यू वॉल्कर यांच्या मते, झोप नसेल येत तर तशेच उभे राहा आणि इतर कोणत्याही दुसऱ्या कामात आपले मन गुंतवा. ज्यामुळे तुमचे मन शांत होऊन तुम्हाला शांत झोप लागू शकते.

Harshada Shinkarhttps://www.mymahanagar.com/author/sharshada/
गेल्या ५ वर्षांपासून प्रिंट आणि डिजिटल मीडिया क्षेत्राचा अनुभव. लाईफ स्टाईल, फॅशन, महिलांसंबधित विषयावर लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -