घरCORONA UPDATE१४ महिन्याच्या बाळाची कोरोनाशी झुंज संपली

१४ महिन्याच्या बाळाची कोरोनाशी झुंज संपली

Subscribe

गुजरातमधील जामनगरमध्ये अवघ्या १४ महिन्याच्या बाळाचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.

जगात थैमान घालणाऱ्या कोरोनाने अक्षरश: हाहाकार केला आहे. दरम्यान, देशात कोरोनाच्या संख्येत देखील दिवसेंदिवस वाढ होताना दिसत आहे. दरम्यान, गुजरातमधील जामनगरमध्ये अवघ्या १४ महिन्याच्या बाळाचा कोरोनामुळे मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. रविवारी या मुलाला कोरोनाचा संसर्ग झाल्याचे कळले आणि मंगळवारी या बाळाची कोरोनाशी असलेली झुंज संपली.

१६ लोकांचा मृत्यू

गुजरातमध्ये कोरोनामुळे आतापर्यंत १६ लोकांचा मृत्यू झाला आहे. तर गुजरातमध्ये मंगळवारी सूरत आणि पाटनामध्ये दोघांचा मृत्यू झाला होता. दरम्यान, कोरोनाचा प्रादुर्भाव होऊ नये, याकरता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशात २१ दिवसांचा लॉकडाऊन देखील जाहिर केला. मात्र, असे असून देखील कोरोनाबाधितांच्या संख्येत वाढ होताना दिसत आहे.

- Advertisement -

देशात ४ हजार ७८४ लोकांना कोरोनाची लागण

देशात कोरोनाबाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे. आतापर्यंत देशात ४ हजार ७८४ लोकांना कोरोनाची लागण झाली आहे. तर १२४ लोकांचा मृत्यू झाला आहे. याशिवाय कोरोनावर मात करत आतापर्यंत ३२५ लोक या आजारातून बरे झाले आहेत. तर देशातील इतर राज्यांच्या तुलनेत महाराष्ट्रात सर्वाधिक कोरोनाचे रुग्ण आहेत. महाराष्ट्रात आता कोरोनाबाधितांची संख्या १ हजारहून अधिक आहे. तर देशात गेल्या २४ तासात कोरोनाचे नवे ५०८ रुग्ण आढळले आहेत. तर १३ जणांचा मृत्यू झाला आहे.

सात देशात ७८ हजारहून अधिक कोरोनाचे बळी

जगात कोरोनाबाधितांची संख्या १३ लाख ७८ हजार ५२७ वर गेली असून आतापर्यंत या आजाराने ७८ हजार ११० जणांचा बळी घेतला आहे.

- Advertisement -
  • अमेरिकेत गेल्या २४ तासांत तिथे ११ हजार नव्या रुग्णांची भर पडली आहे. तर मृतांची संख्या मंगळवारी रात्रीपर्यंत ११ हजार ८०० इतकी होती.
  • तर इटलीमध्ये मृतांची संख्या १६ हजार ५२३ इतकी झाली आहे.
  • स्पेनमध्ये १३ हजार ८०० जणांचा मृत्यू झाला आहे.
  • तर फ्रान्समध्ये आतापर्यंत ८ हजार ९०० जणांचा मृत्यू झाला आहे.
  • तसेच ब्रिटनमध्ये ६ हजार १६० जणांचा मृत्यू झाला आहे.
  • तर इराण आणि चीन या दोन देशांमध्ये मिळून मृतांचा आकडा सुमारे ७ हजार झाला आहे.

    हेही वाचा – वुहान शहर ७६ दिवसांनंतर लॉकडाऊनमधून मुक्त


- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -